Thane : कळवा खाडी पुलाचा वळसा आता संपणार; ठाण्याहतून थेट नवी मुंबईला जाण्यासाठी मास्टर प्लॅन तयार
Last Updated:
Thane Navi Mumbai : ठाणे ते नवी मुंबई अंतर कमी करण्यासाठी एका प्रकल्पाला 723.42 कोटींची मंजुरी मिळाली. या नव्या पुलामुळे प्रवाशांचा 20-30 मिनिटांचा वेळ वाचणार असून वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
ठाणे : ठाणे शहरातील कोपरी ते नवी मुंबईतील ऐरोली आण दिघा या दरम्यानचे अतंर कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा मेगा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने तब्बल 723.42 कोटी रुपयांच्या प्रस्तावालाही मान्यता दिली आहे.
कळवा खाडी पुलाचा वळसा आता संपणार
कोपरी ते नवी मुंबईतील ऐरोली आणि दिघा हे अंतर सध्या पार करण्यासाठी कळवा खाडी पुलावरुन नागरिकांना वळसा घालून जावे लागेत ज्यात त्यांना प्रवासासाठी 20 ते 30 मिनिटांचा वेळ लागतो.
एमएमआरडीएच्या अलिकडे सादर झालेल्या अर्थसंकल्पात मुंबई महानगरातील नवी मुंबई तसेच ठाणे या शहरांना जोडण्यासाठी अनेक पर्यायांचा प्रस्ताव सादर केला आहे. आजही ठाणे शहर आणि नवी मुंबई शहर अनेक पर्यायी मार्गाने जोडले आहे. ज्यात मुंबईहून तुम्ही मुलुंड पूर्वेकडे आल्यानंत ऐरोली रस्त्याने नवी मुंबई येता तर ठाणे शहरातून कळवा पूलावरुन ठाणे बेलापूर मार्गे तुम्ही नवी मुंबई शहरात प्रवेश करता. पण सध्या या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी वाढलेली आहे आणि त्यामुळे पर्यायी मार्ग असावे असा विचार विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला होता.
advertisement
'हा' नवा मार्ग सज्ज
अलिकडे सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात नवी मुंबई आणि ठाणे या दोन शहरांना जोडण्यात येणाऱ्या नव्या खाडी पुलाचा प्रस्ताव मांडला. याआधी ठाणे पूर्व भागातील कोपरी ते नवी मुंबईतील पटणी या भागात खाडी पुलाचा प्रस्ताव होता. पण आता सुधारित मान्यता देण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 2:17 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane : कळवा खाडी पुलाचा वळसा आता संपणार; ठाण्याहतून थेट नवी मुंबईला जाण्यासाठी मास्टर प्लॅन तयार









