advertisement

BMC : सत्ताकेंद्र बदललं! वांद्रे नव्हे, आता अंधेरीवरून चालणार बीएमसी? भाजपच्या या आमदाराच्या हाती रिमोट कंट्रोल!

Last Updated:

BMC : मुंबई महापालिकेच्या कारभाराचं सत्ता केंद्र हे वांद्रे येथील मातोश्रीवर गेल्याचं स्पष्ट झाले. आता बीएमसी सत्ता केंद्राचा रिमोट कंट्रोल आता वांद्रेहून अंधेरीला गेल्याची पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

सत्ताकेंद्र बदललं! वांद्रे नव्हे, आता अंधेरीवरून चालणार बीएमसी? भाजपच्या या आमदाराच्या हाती रिमोट कंट्रोल
सत्ताकेंद्र बदललं! वांद्रे नव्हे, आता अंधेरीवरून चालणार बीएमसी? भाजपच्या या आमदाराच्या हाती रिमोट कंट्रोल
मुंबई: मुंबई महानगरपालिकेत सध्या सत्तेचा रिमोट कंट्रोल नेमका कुणाकडे आहे? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीला पराभवाचा धक्का बसला. तर, भाजप-शिवसेना शिंदे गटाची सत्ता आली. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या कारभाराचं सत्ता केंद्र हे वांद्रे येथील मातोश्रीवर गेल्याचं स्पष्ट झाले. आता बीएमसी सत्ता केंद्राचा रिमोट कंट्रोल आता वांद्रेहून अंधेरीला गेल्याची पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
एकीकडे महपौर रितू तावडे यांच्या भोवती वादाचं मोहोळ उठलं आहे. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला डावललं जात असल्याचं चित्र आहे. मात्र, त्याच वेळी मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कामात भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांची प्रशासकीय कामांमधील वाढती सक्रियता आणि उपस्थिती यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. मंगळवारी झालेल्या 'मुंबई क्लीन लीग' कार्यक्रमातील घडामोडींमुळे मुंबई महापालिकेत अमित साटमच नवे बॉस असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
advertisement

महापौर गैरहजर, साटम प्रमुख स्थानी

नुकत्याच पार पडलेल्या 'मुंबई क्लीन लीग' कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमार आणि महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या शेजारी अमित साटम यांची प्रमुख उपस्थिती लक्षवेधी ठरली. एकीकडे महापौर रितू तावडे या महत्त्वाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होत्या, तर दुसरीकडे राजशिष्टाचारानुसार (Protocol) प्रमुख स्थान मिळणे अपेक्षित असलेल्या उपमहापौर संजय घाडी यांना दुय्यम स्थान देण्यात आल्याचा आरोप झाला आहे. या प्रकारामुळे पालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.
advertisement

शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

या प्रकरणावर शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी कडक शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. "प्रशासनाकडून उपमहापौरांचा अपमान झाला असून, बाहेरील व्यक्तींना अवाजवी महत्त्व दिले जात आहे," असा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासकीय कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन होत असल्याचे घोले यांनी निदर्शनास आणून दिले.
advertisement

आदित्य ठाकरेंशी तुलना?

राजकीय वर्तुळात आता अमित साटम यांची तुलना माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी होऊ लागली आहे. महाविकास आघाडीच्या काळात आदित्य ठाकरे पालिकेच्या कामकाजात आणि निर्णय प्रक्रियेत सक्रिय हस्तक्षेप करत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात असे. आता तोच कित्ता अमित साटम गिरवत आहेत का? अशी कुजबुज खुद्द सत्ताधारी गोटातूनही ऐकायला मिळत आहे. या सर्व घडामोडींमुळे मुंबई महानगरपालिकेत सत्तेची केंद्रं बदलत असून अमित साटम यांचा प्रभाव प्रशासनावर वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC : सत्ताकेंद्र बदललं! वांद्रे नव्हे, आता अंधेरीवरून चालणार बीएमसी? भाजपच्या या आमदाराच्या हाती रिमोट कंट्रोल!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement