advertisement

Kalyan News : लोखंडी रॉड, दांडक्याने बेदम मारहाण, पुनर्विकासाच्या वादातून बिल्डरवर जीवघेणा हल्ला,कल्याण हादरलं

Last Updated:

Kalyan News : कल्याणमध्ये इमारतीच्या पुनर्विकासावरून दोन विकासकांमध्ये वाद चिघळला. वाद वाढत गेल्याने अत्यंत भयानक प्रकार घडला असून या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कल्याण शहरात रिडेव्हलपमेंटच्या वादातून विकासकांच्या दोन गटात हाणामारी झालेली आहे.
कल्याण शहरात रिडेव्हलपमेंटच्या वादातून विकासकांच्या दोन गटात हाणामारी झालेली आहे.
कल्याण : कल्याण पश्चिमेतील भोईरवाडी भागात पुनर्विकासाच्या असलेल्या वादातून एका विकासकावर गंभीर हल्ला झाल्याची घटना समोर आलेली आहे. मिलिंद साहेबराव चव्हाण (वय44) असे जखमी विकासकाचे नाव असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. घडलेल्या या घटनेप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे.
सोसायटीच्या कामावरून कल्याणात टोकाचा वाद
मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद हे हाऊस ऑफ चव्हाण या अंतर्गत येणाऱ्या साई गजानन इन्फा या कंपनीमार्फत असलेल्या इमारत बांधकामे काम करतात. त्यांनी कल्याण पश्चिमेतील भोईरवाडीतील एका सोसायटीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम हाती घेतले होते आणि त्या कामासंबंधीची सर्व कागदपत्रे पूर्ण केलेली होती.
काम बंद पाडलं अन् मग थेट हल्ला
रविवारी संध्याकाळी मिलिंद यांना सोसायटीच्या अध्यक्षांनी फोन करुन काहीजण काम बंद पाडत असल्याचे सांगितले. मिलिंद हे त्यानंतर त्या सोसायटीत पोहोचले आणि तिथे मनोज ढोबले तसेच त्यांच्या साथीदारांनी ते काम थांबवण्यास सांगितले. धक्कादायक गोष्ट म्हणजे प्रताप ढोबळे यांनी मिलिंद यानी धमकी दिली.
advertisement
धमकीवर न थांबत प्रताप ढोबळे आणि त्यांच्या सहा साथीदारांनी लोखंडी सळई शिवाय लाकडी दांडक्यांनी मिलिंदवर हल्ला केला. या हल्ल्यात मिलिंद आणि त्यांच्यासह काहीजण जखमी झाले. सुरुवातीला कल्याणमधील पालिकेच्या रुग्णालयात नेण्याक आला पण प्रकृती अधिक खालवत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात नेले.सध्या या प्रकरणी प्रताप ढोबळे आणि त्यांच्या सह साथीदारांवर गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News : लोखंडी रॉड, दांडक्याने बेदम मारहाण, पुनर्विकासाच्या वादातून बिल्डरवर जीवघेणा हल्ला,कल्याण हादरलं
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement