First Aid Tips : मधमाशी चावल्यावर घाबरू नका, सर्वात आधी करा 'ही' गोष्ट! डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Importanat safety tips : मधमाशी चावल्यानंतर घाबरून न जाता, काही गोष्टी केल्या तर तुमचा त्रास कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत लगेच काय करावं याबद्दल डॉक्टरांनी माहिती दिलीय.
मुंबई : मधमाशा सहसा सगळी कडेच नसतात. पण एखादेवेळी आपण चुकून मधमाशांच्या मोहळाजवळ गेलो आणि त्या चावल्या तर अशा परिस्थितीत आपल्याला काय करावं सुचत नाही. पण अशा परिस्थितीत घाबरून न जाता, काही गोष्टी केल्या तर तुमचा त्रास कमी होऊ शकतो. मधमाशी चावल्यानंतर लगेच काय करावं याबद्दल डॉक्टरांनी माहिती दिलीय.
मधमाशी चावल्यानंतर ती तिचे विष त्वचेत लगेच सोडते. यामुळे तीव्र वेदना, चावलेल्या जागी लालसरपणा आणि सूज, हलकी खाज किंवा जळजळ जाणवते. ज्या ठिकाणी मधमाशी चावली आहे, त्या ठिकाणी मध्यभागी एक लहान पांढरा डाग दिसतो. काही लोकांचा त्रास काही तासांत कमी होतो, तर काही लोकांचा तर एक ते दोन दिवसांत आपोआप संपतो. हैदराबाद येथील डॉ. सुधीर कुमार (MD, DM) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर याबद्दल महिती दिली आहे.
advertisement
मधमाशी चावल्यानंतर लगेच करा या गोष्टी..
सर्वात आधी तर जिथे तुम्हाला मधमाशी चावली आहे, त्या जागेपासून दूर जा. कारण मधमाश्या दंश केल्यानंतर एक विशिष्ठ प्रमकारचा गंध सोडतात. या वासाला आकाराशीर होऊन इतर मधमाशा तिथेयेतात. म्हणून लवकरात लवकर ती जागा सोडा.
याचबरोबर मधमाशीने दंश केल्यानंतर काट्यासारखा जो भाग आपल्या त्वचेमध्ये अडकतो, तो आधी बाहेर काढा. तो बाहेर काढण्यासाठी नख किंवा क्रेडिट कार्डचा वापर करा. मात्र चुकूनही बोटांनी किंवा चिमट्याने ओढून काढू नका. नाहीतर उरलेलं विष शरीरात आणखी पसरेल.
advertisement
मधमाशीने दंश केलेली जागा साबण आणि थंड पाण्याने स्वच्छ धुवा. यावर बर्फ लावू शेका, यामुळं सूज कमी होईल. वेदना खूप जास्त असतील किंवा खूप खाज येत असेल, तर त्वरित डॉक्टरांकडे जा. कारण काही लोकांना मधमाशीच्या विषाची तीव्र ऍलर्जी होऊ शकते. म्हणून श्वास घेताना त्रास होत असेल, चेहरा, ओठ, जीभ किंवा घशावर सूज आली असेल, संपूर्ण शरीरावर पुरळ उठले असतील, चक्कर येत असेल, अशक्तपणा, शुद्ध हरपणे, मळमळ, उलट्या किंवा पोटात तीव्र वेदना, अचानक बीपी कमी झाला असेल तर या केसमध्ये लगेच अॅम्ब्युलन्स बोलावून व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये न्या.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 12:52 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
First Aid Tips : मधमाशी चावल्यावर घाबरू नका, सर्वात आधी करा 'ही' गोष्ट! डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला






