advertisement

EV कारने घेतला एकाच कुटुंबातील 7 जणांचा बळी, चार्जिंग करताना लागली आग, सिलेंडर फुटले

Last Updated:

बुधवारी पहाटे एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका इलेक्ट्रीक कारमुळे एकाच कुटुंबातील सात जणांचा भयंकर अंत झाला आहे.

7 member of same family died in indore
7 member of same family died in indore
बुधवारी पहाटे एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका इलेक्ट्रीक कारमुळे एकाच कुटुंबातील सात जणांचा भयंकर अंत झाला आहे. कारची चार्जिंग सुरू असताना झालेल्या शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीमुळे ही भीषण दुर्घटना घडली. सातही जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील सात जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर शहाराच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीमध्ये पहाटे ४ च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्घटना मनोज पुगालिया यांच्या निवासस्थानी घडली. रात्री उशिरा त्यांनी आपली इलेक्ट्रिक कार घराबाहेर चार्जिंगसाठी लावली होती. पहाटे ४ च्या सुमारास चार्जिंग पॉईंटवर अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि कारने पेट घेतला. ही आग इतकी वेगाने पसरली की काही वेळातच आगीने घराला आपल्या विळख्यात घेतलं.
advertisement

सिलेंडरचे स्फोट

आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर घरात ठेवलेल्या गॅस सिलेंडरपर्यंत ज्वाळा पोहोचल्या. यामुळे एकापाठोपाठ एक अशा १० हून अधिक सिलिंडर्सचे भीषण स्फोट झाले. स्फोटांची तीव्रता इतकी प्रचंड होती की घराचा काही भाग कोसळला. पोलीस आयुक्त संतोष कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज पुगालिया यांचा पॉलिमरचा व्यवसाय होता. व्यवसायानिमित्त त्यांनी घरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील रसायने साठवून ठेवली होती. कारची आग, गॅस सिलेंडरचे स्फोट आणि रसायने या तिन्ही घटकांमुळे घरात आगडोंब उडाला. घरात झोपलेल्या लोकांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.
advertisement

इलेक्ट्रॉनिक लॉकने केला घात

दुर्दैवाची बाब म्हणजे घराला इलेक्ट्रॉनिक डिजिटल लॉक बसवण्यात आलं होतं. आगीमुळे घराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने हे डिजीटल लॉक उघडलं नाही. परिणामी, कुटुंबातील सदस्य आतच अडकून पडले. अग्निशमन दलाच्या जवानांना घरात प्रवेश करण्यासाठी दरवाजे तोडावे लागले, मात्र तोपर्यंत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
EV कारने घेतला एकाच कुटुंबातील 7 जणांचा बळी, चार्जिंग करताना लागली आग, सिलेंडर फुटले
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement