advertisement

Super Duper Trailer : दोन कुटुंबाना विकला गेला एकच फ्लॅट! निर्मिती सावंत-ललित प्रभाकर आमनेसामने, तुफान राडा

Last Updated:

Super Duperr Trailer : जेव्हा एक फ्लॅट दोन कुटुंबांना विकला जातो... तेव्हा काय धम्माल होते हे या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. नावाप्रमाणे सिनेमाचा ट्रेलरही सुपर डुपर आहे.

News18
News18
यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहकुटुंब सहपरिवार धमाल मनोरंजनाची मेजवानी 'सुपर डूपर' या सिनेमातून मिळणार आहे. ललित प्रभाकर, निर्मिती सावंत आणि कमाल कलाकारांची फळी असलेल्या सुपर डुपर या सिनेमाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. सिनेमाच धम्माल ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
नावाप्रमाणेच हा ट्रेलरही सुपर डुपर आहे. एका घराभोवती फिरणारा गंमतीदार गोंधळ दिसत आहे. एका बाजूला परंपरा जपणारे गावाकडचे  कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची कास धरणारी शहरातलं तरुण जोडपं. या दोन्ही कुटुंबांना एकाच फ्लॅटची विक्री होते आणि या घराच्या ताब्यावरून वादाची ठिणगी पडते. आता एकच घर आणि राहणारे दोन टोकाचे गट… दोघांची जीवनशैली, सवयी आणि विचार अगदी वेगळे असल्यामुळे एकत्र राहतानाची त्यांची मजेशीर जुगलबंदी ट्रेलरमध्ये दिसत आहे.
advertisement
'झाड उगायला माती आणि माणूस जगायला नाती लागतातच' निर्मिती सावंत यांच्या तोंडी असलेला भावस्पर्शी संवादही ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेतो. ट्रेलरचा शेवट तर अजिबात चुकवू नका. निर्माती सावंत यांचा भन्नाट अंदाज पाहायला मिळत आहे.  विनोद, नात्यांमधली ऊब आणि भावनिक क्षण यांचा सुंदर मेळ यात दिसून येतो.
advertisement
सुपर डुपर या सिनेमात निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.
advertisement
या ट्रेलर लाँच प्रसंगी दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणाले, ‘ ‘सुपर डुपर’ हा केवळ विनोदी चित्रपट नाही, तर नात्यांमधल्या गंमतीजमती आणि त्यामागची भावनिक बाजू दाखवणारा प्रवास आहे. दोन पूर्णपणे वेगळ्या स्वभावाची कुटुंबं एकाच घरात राहायला लागली की, किती गंमतीशीर प्रसंग घडू शकतात, हे आम्ही हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडलं आहे.
येत्या 3 एप्रिलपासून 'सुपर डुपर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक धमाल कौटुंबिक महासोहळा ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Super Duper Trailer : दोन कुटुंबाना विकला गेला एकच फ्लॅट! निर्मिती सावंत-ललित प्रभाकर आमनेसामने, तुफान राडा
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement