तुमच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. अचानक कुठूनतरी धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यातील नम्रता आजूबाजूच्या लोकांना प्रभावित करेल. पैशांचा वापर गरजेनुसारच करा, अन्यथा भविष्यात अडचण येऊ शकते. सरकारी अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील. आई-वडिलांशी असलेले नाते जपा.
अंक 2 (कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक)
आज तुम्ही खूप हळवे आणि भावूक राहाल. कुटुंबाकडून मिळणारे प्रेम पाहून तुमचे मन भरून येईल. आईचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस सर्वार्थाने उत्तम आहे. तुमचे मनोबल वाढवण्यासाठी भगवान शंकराची उपासना करणे फायदेशीर ठरेल.
advertisement
अंक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले लोक)
तुमचा आजचा दिवस ठीक असेल. कुटुंबासोबत धार्मिक सहलीचे नियोजन करू शकता. मोठे व्यवहार करणे आज टाळलेले बरे. तुमचे ज्ञान आणि विचार इतरांना नक्कीच आकर्षित करतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा - समोरच्याला गरज असेल तरच सल्ला द्या.
लग्नाआधीच पाहा कुंडली! नंतर दोघांमध्ये तिसऱ्याची एंट्री करू शकतो हा ग्रह
अंक 4 (कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक)
आज नशीब तुमची फारशी साथ देणार नाही. कोणतेही काम करताना त्याची नीट खात्री करूनच पुढे जा. आर्थिक समस्यांमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. आईची तब्येत चिंतेचा विषय ठरू शकते, त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी तुमचे विचार प्रभावी ठरणार नाहीत, त्यामुळे शांत राहणे हिताचे आहे.
अंक 5 (कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक)
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आहे. तुमच्या बुद्धिमत्तेची चमक आज सगळ्यांना दिसून येईल. पैसे कमावण्यासाठी नवीन आणि प्रभावी मार्गांचा तुम्ही विचार करू शकता. कामात काही नवीन पद्धती वापरून तुम्ही यश मिळवाल. जर तुम्ही राजकारणात असाल, तर आज थोडे सावध राहा, कोणीतरी तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करू शकते.
अंक 6 (कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक)
आज जोडीदाराशी प्रेमाने वागा. आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, विशेषतः छातीशी संबंधित त्रासामुळे तुम्ही हैराण होऊ शकता. संकटाच्या वेळी एखादी स्त्री तुम्हाला मदतीचा हात देईल. नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस खूप फलदायी ठरेल.
अंक 7 (कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेले लोक)
आजचा दिवस थोडा त्रासाचा असू शकतो. पैशांच्या अडचणीमुळे दिवसभर चिंता राहील. घरातील वादाचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो. विशेषतः जोडीदाराशी होणारे मतभेद तुम्हाला अस्वस्थ करतील. आई आणि पत्नीमध्ये खटके उडण्याची शक्यता असल्याने संयम ठेवा आणि वादात पडू नका.
पूर्ण 1 महिना भयंकर त्रास-अडचणी! सूर्याचा शनिच्या राशीतील प्रवेश 3 राशींना भारी
अंक 8 (कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेले लोक)
महत्त्वाची कामे पूर्ण करताना आज तुम्हाला निराशेचा सामना करावा लागू शकतो. सुख-सुविधा आणि आर्थिक बाबतीत काही अडथळे जाणवतील. मानसिक ताण खूप वाढण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामावर टीका होऊ शकते, त्यामुळे स्वतःला शांत ठेवा आणि कामात चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या.
अंक 9 (कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेले लोक)
तुमचा आजचा दिवस सामान्य असेल. मुख्य म्हणजे तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. पैशांची आवक चांगली राहील. मालमत्तेच्या विषयावर भावांशी चर्चा होऊ शकते. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका, पैसे अडकण्याची भीती आहे. भावांचा सल्ला घेणे तुमच्या फायद्याचे ठरेल.
