सध्या चैत्र नवरात्री सुरू असून नवव्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते. यावर्षी नवमी तिथी 26 मार्च 2026 रोजी सकाळी 11:48 वाजता सुरू होईल आणि 27 मार्च 2026 रोजी सकाळी 10:06 वाजेपर्यंत राहील. त्यामुळे हिंदू दिनदर्शिकेनुसार 26 मार्चलाच रामनवमी साजरी करणे अधिक शुभ मानले जात आहे.
ग्रहयोगामुळे वाढलेले महत्त्व
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाची रामनवमी विशेष ठरण्याचे कारण म्हणजे ग्रहांची अनुकूल स्थिती. 26 मार्च रोजी शुक्र ग्रहाचे दुहेरी संक्रमण होणार असून त्याच दिवशी मंगळ कुंभ राशीत उदयास येणार आहे. या दुर्मिळ ग्रहयोगाचा सकारात्मक परिणाम काही विशिष्ट राशींवर दिसून येऊ शकतो. त्यामुळे या दिवशीचा धार्मिक आणि ज्योतिषीय प्रभाव अधिक प्रभावी मानला जात आहे.
advertisement
या 5 राशींसाठी विशेष लाभ
मेष
रामनवमी आणि ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक आणि वैयक्तिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नातील अडथळे दूर होऊन नवीन संधी निर्माण होतील. करिअरमध्ये प्रगती होईल तसेच व्यवसायातही वाढ दिसून येईल. नातेसंबंध अधिक मजबूत होतील.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक बदल घडवणारा ठरेल. शुक्राच्या प्रभावामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. उत्पन्न वाढण्याची शक्यता असून परदेशातूनही लाभ मिळू शकतो. नातेसंबंध सुधारतील आणि मानसिक शांतता मिळेल.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. पदोन्नतीची शक्यता असून नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. नव्या योजना यशस्वीपणे पूर्ण होतील आणि वैयक्तिक आयुष्यातही स्थैर्य येईल.
तूळ
तूळ राशीसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल आणि जबाबदाऱ्या वाढतील. पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि आत्मविश्वासात वाढ होईल.
मीन
मीन राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. व्यवसायात वाढ होईल आणि वैवाहिक जीवन अधिक सुखकर बनेल.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करू नये)
