TRENDING:

APMC Market: द्राक्षाच्या दरात मोठी उलथापालथ, केळी भाव घसरले, कांद्याची काय स्थिती?

Last Updated:

उन्हाळी कांद्याला नाशिक मार्केटमध्ये सरासरी 1108 रुपये तसेच अहिल्यानगर आणि नागपूर मार्केटमध्ये 900 रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: आज 24 मार्च रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 2 लाख 89 हजार 140 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. यामध्ये लाल कांद्याला नाशिक मार्केटमध्ये 846 रुपये, सोलापूर मार्केटमध्ये 700 रुपये तर अमरावती मार्केटमध्ये 1150 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे सरासरी दर मिळाला. तसेच उन्हाळी कांद्याला नाशिक मार्केटमध्ये सरासरी 1108 रुपये तसेच अहिल्यानगर आणि नागपूर मार्केटमध्ये 900 रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळाला.
advertisement

लिंबाची आवक

वाढत्या उन्हासह बाजारातील लिंबाची मागणी देखील वाढते आहे. लिंबाच्या आवकेत आज घट दिसून आली. राज्याच्या मार्केटमध्ये आज 576 क्विंटल आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 311 क्विंटल लिंबास 2500 ते 4000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल लिंबास 12500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

advertisement

Success Story : कांद्याने शेतकऱ्याला बनवलं लखपती, तरुण शेतकऱ्याने पद्धत बदलली अन् 6 लाख कमावले!

द्राक्ष आवक

राज्याच्या कृषी मार्केटमध्ये द्राक्ष आवक वाढलेली दिसली. आज 1356 क्विंटल द्राक्षाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 1059 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास 10000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर बाजारात आवक झालेल्या 31 क्विंटल द्राक्षास 10250 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

advertisement

केळीची आवक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाच्या दरात मोठी उलथापालथ, केळी भाव घसरले, कांद्याची काय स्थिती?
सर्व पहा

राज्यामध्ये केळीचे मार्केट पुरतेच गडगडले दिसते. केळी निर्यात बंद असल्याचे कारण पुढे करत केळी उत्पादकांची फरफट होताना दिसते. आज केवळ 358 क्विंटल केळीची आवक झाली. नाशिक बाजारात आवक झालेल्या 261 क्विंटल केळीस प्रतीनुसार 800 ते 1800 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: द्राक्षाच्या दरात मोठी उलथापालथ, केळी भाव घसरले, कांद्याची काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल