पंचांगानुसार, सध्या देवगुरू बृहस्पती मिथुन राशीत स्थित असून २१ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १ वाजता चंद्रदेखील मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या प्रवेशामुळे चंद्र आणि गुरू यांची युती होऊन ‘गजकेसरी राजयोग’ निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि काही राशींसाठी तो विशेष लाभदायक ठरणार आहे.
मेष राशी
advertisement
मेष राशीच्या व्यक्तींना या योगाचा मोठा फायदा होणार आहे. आर्थिक अडचणी दूर होतील आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल, करिअरमध्ये प्रगती होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी मिळू शकते. पदोन्नतीची शक्यता असून आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासोबत प्रवासाचेही योग जुळून येतील.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक ठरणार आहे. आत्मविश्वासात वाढ होईल आणि आनंददायी बातम्या मिळतील. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि कुटुंबात शुभकार्ये होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. परदेश प्रवासाचे योग असून मानसिक तणावातून दिलासा मिळेल. वैवाहिक जीवनही सुखकर राहील आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग अत्यंत अनुकूल ठरेल. अनेक सकारात्मक घडामोडी घडतील. अविवाहितांचे विवाह ठरू शकतात आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. करिअरमध्ये प्रगती होऊन अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी कौतुक मिळेल, पगारवाढ किंवा उच्च पदाची संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनाही चांगले यश मिळेल. धार्मिक स्थळांना भेट देण्याचे योगही संभवतात.
कर्क राशी
कर्क राशीसाठीही चंद्राचा हा प्रवेश लाभदायक ठरणार आहे. मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत घेणाऱ्यांना यश मिळेल. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील. नोकरीत सकारात्मक बदल जाणवतील. कुटुंबासोबत प्रवास आणि धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
