कांद्याच्या दरांत घट
राज्याच्या अनेक भागात रब्बी कांद्याची काढणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारातील कांद्याची आवक टिकून होती. मात्र आज 29 मार्च रोजी राज्याच्या बाजारात कांदा आवकेत घट दिसून आली. 40 हजार 141 क्विंटल कांद्याची एकूण आवक राहिली. यामध्ये लाल कांद्याला धाराशिव मार्केटमध्ये 800 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सरासरी दर मिळाला. लाल कांद्याचा सरासरी भाव दबावातच दिसला.
advertisement
Weather Alert: सावधान! महाराष्ट्रावर आता तिहेरी संकट, 72 तास धोक्याचे, 20 जिल्ह्यांना अलर्ट
उन्हाळी कांद्याच्या भावामध्ये आज प्रतिक्विंटलमागे जवळपास एक हजार रुपयांची घट दिसून आली. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 11 हजार 912 क्विंटल उन्हाळी कांद्यास मिळालेला 1000 रुपये सरासरी भाव आजचा सर्वाधिक बाजारभाव ठरला.
लिंबूची आवक घटली
बाजारातील लिंबूस चांगला उठाव असला तरी आवकेतील घट कायम आहे. राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 67 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी पुणे बाजारात आवक झालेल्या 46 क्विंटल लिंबूस 10000 ते 12000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच धाराशिव मार्केटमध्ये आवक झालेल्या 18 क्विंटल कागदी लिंबूस 8250 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
मार्केटला द्राक्षे कमीच
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये द्राक्ष आवकेत घट दिसली. आज 135 क्विंटल द्राक्षाची एकूण आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 117 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास 7000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच पुणे बाजारात आवक झालेल्या 3 क्विंटल द्राक्षास 4000 प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
केळीची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये केळीची 481 क्विंटल एकूण आवक राहिली. यापैकी पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 108 क्विंटल केळीस मिळालेला 2450 रुपये आजचा सर्वाधिक बाजारभाव ठरला.





