TRENDING:

आज भागवत एकादशी! 31 डिसेंबरचा शुभं योग कोणासाठी ठरणार 'गुडलक', कुणाला राहावं लागणार सावध? वाचा तुमचं राशीभविष्य

Last Updated:

आज 31 डिसेंबर, 2025 या वर्षाचा अखेरचा दिवस. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत खास आहे. आज 'भागवत एकादशी' असून सोबतीला 'सर्वार्थ सिद्धी योग' जुळून आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Today's Horoscope : आज 31 डिसेंबर, 2025 या वर्षाचा अखेरचा दिवस. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत खास आहे. आज 'भागवत एकादशी' असून सोबतीला 'सर्वार्थ सिद्धी योग' जुळून आला आहे. या दुर्मिळ योगायोगामुळे आजच्या दिवशी मेष ते मीन या 12 राशींच्या जातकांना ग्रहांच्या विशेष स्थितीचा लाभ मिळणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करताना आजचा दिवस तुमच्या राशीसाठी नेमके काय घेऊन आला आहे, ते पाहूया.
News18
News18
advertisement

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. कामाच्या ठिकाणी घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनमध्ये अतिउत्साही राहून पैशांचा अपव्यय टाळा. कुटुंबासोबत वेळ घालवणे आनंददायी ठरेल.

वृषभ (Taurus)

तुमच्यासाठी आजचा दिवस सुखाचा आणि लक्झरीचा असेल. 'सर्वार्थ सिद्धी योगा'मुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत रोमँटिक डिनरचा प्लॅन यशस्वी होईल.

advertisement

मिथुन (Gemini)

आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. थर्टी फर्स्टच्या पार्टीत खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. कामात नवीन जबाबदारी मिळू शकते. मित्रांच्या मदतीने महत्त्वाचे काम मार्गी लागेल.

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या व्यक्तींना आज मानसिक शांतता मिळेल. एकादशी असल्यामुळे तुमचा ओढा अध्यात्माकडे असेल. मुलांकडून काही आनंदाची बातमी मिळू शकते. नवीन वर्षाचे स्वागत सात्विक पद्धतीने करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

advertisement

सिंह (Leo)

आज तुम्ही 'गोल्डन मोड' मध्ये असाल. तुमच्या उर्जेचा स्तर खूप उच्च असेल. समाजात तुमचा मान वाढेल. आज तुम्ही जे काही ठरवाल ते पूर्ण होईल. सेलिब्रेशनमध्ये तुम्ही आकर्षणाचे केंद्र ठराल.

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या जातकांसाठी आज आर्थिक फायद्याचे योग आहेत. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. प्रवासाचे योग आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही खूप उत्साही असाल.

advertisement

तूळ (Libra)

आज सावधगिरीने वागण्याचा दिवस आहे. विनाकारण वादात पडू नका. मद्यपान आणि मांसाहार टाळल्यास आजचा दिवस शुभ जाईल. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल.

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस भाग्योदयाचा आहे. जुन्या वादांतून सुटका होईल. व्यावसायिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांमध्ये सावध राहा.

धनु (Sagittarius)

तुमचा स्वामी गुरू उच्च राशीत जाण्याच्या तयारीत असल्याने तुम्हाला आजपासूनच त्याचे शुभ फळ मिळण्यास सुरुवात होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. घरगुती सेलिब्रेशनला प्राधान्य द्या.

advertisement

मकर (Capricorn)

शनीची साडेसाती सुरू असली तरी 'सर्वार्थ सिद्धी योगा'मुळे आज कामात यश मिळेल. जास्त कामाचा ताण घेऊ नका. नवीन वर्षाचा संकल्प आजच केल्यास तो पूर्ण होण्याची शक्यता जास्त आहे.

कुंभ (Aquarius)

तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. मित्रांसोबत नवीन वर्षाचे स्वागत करताना मर्यादा पाळा. आर्थिक व्यवहार करताना डोळे उघडे ठेवा. एखादे सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces)

आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. एकादशीचे पुण्य आणि नवीन वर्षाची चाहूल तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल. तुमच्या स्वभावातील लवचिकता तुम्हाला यश मिळवून देईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनी दारू पिणं चांगलं की वाईट? पुरुषाच्या तुलनेत शरिरावर कसा होतो परिणाम?
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
आज भागवत एकादशी! 31 डिसेंबरचा शुभं योग कोणासाठी ठरणार 'गुडलक', कुणाला राहावं लागणार सावध? वाचा तुमचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल