रात्री कुत्र्याचे रडणे: धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय संकेत
नकारात्मक ऊर्जेचा वावर: असे मानले जाते की, कुत्र्यांची दृष्टी आणि वास घेण्याची शक्ती मानवापेक्षा कित्येक पटीने जास्त असते. त्यांना अशा सूक्ष्म लहरी किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवते जी सामान्य डोळ्यांना दिसत नाही. जेव्हा कुत्रा एका विशिष्ट दिशेकडे पाहून जोरात ओरडतो, तेव्हा तो त्या दिशेकडून येणाऱ्या संकटाचा किंवा अदृश्य शक्तीचा इशारा देत असतो, असे मानले जाते.
advertisement
यमराजाचे दूत: पौराणिक समजुतीनुसार, कुत्र्याला यमराजाचा दूत मानले जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ असतो किंवा परिसरात मृत्यूचे सावट असते, तेव्हा कुत्र्यांना यमदूतांचा वावर जाणवतो आणि ते रडू लागतात. म्हणूनच, घराबाहेर कुत्र्याचे रडणे हे एखाद्या अप्रिय घटनेचे किंवा 'मृत्यूचे' संकेत मानले जाते.
कालभैरवाचे वाहन: कुत्रा हा भगवान कालभैरवाचे वाहन मानला जातो. जर पाळीव कुत्रा अचानक खाणे-पिणे बंद करून रडू लागला, तर ते घरातील मालकावर येणाऱ्या मोठ्या संकटाचे किंवा आर्थिक हानीचे लक्षण मानले जाते.
कुत्रा संकटाचा इशारा कसा देतो?
विशिष्ट दिशेकडे पाहणे: जर कुत्रा सतत घराच्या एका कोपऱ्याकडे किंवा दाराकडे पाहून भुंकत असेल, तर त्या दिशेने वास्तुदोष किंवा नकारात्मकता असल्याचे ते चिन्ह आहे.
जमीन उकरणे: घराच्या दारात कुत्रा जमीन उकरत असेल, तर ते आगामी आर्थिक संकटाचे किंवा चोरीचे संकेत मानले जातात.
कान टवकारणे: अचानक शांत बसलेला कुत्रा कान टवकारून विचित्र आवाज काढत असेल, तर त्याला काहीतरी नैसर्गिक आपत्तीची चाहूल लागलेली असू शकते.
मृत्यूचा संकेत: अंधश्रद्धा की सत्य?
"कुत्रा रडला की कोणीतरी वारणार" ही भीती समाजात खूप खोलवर रुजलेली आहे. अनेकदा कुत्र्याच्या रडल्यानंतर परिसरात कोणाचा तरी मृत्यू झाल्याच्या घटना घडतात, ज्यामुळे या श्रद्धेला बळ मिळते. मात्र, विज्ञानानुसार याला कोणताही अधिकृत पुरावा नाही. प्राणी तज्ज्ञांच्या मते, कुत्रा 'रडत' नसून तो 'हाऊलिंग' करत असतो.
काय उपाय करावेत?
शिवनामाचा जप: मनात भीती वाटत असल्यास 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करावा. शिवभक्तीने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
कुत्र्याला अन्न देणे: कुत्र्याला कालभैरवाचे रूप मानून त्याला दूध किंवा भाकरी खाऊ घालावी. यामुळे शनीचे आणि राहू-केतूचे दोष कमी होतात.
घरात धूप-दीप करणे: घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी सायंकाळी कापूर किंवा गुग्गुळ याचा धूप करावा.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
