Soybean Price : सोयाबीनच्या दरात मोठी उलथापालथ, आगामी काळात 5000 जाणार? मार्केटमधून अपडेट समोर
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मागील काही दिवसांत सोयाबीनचे दर वाढले आहेत. सोयाबीनला 4600 ते 4700 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे.
जालना : मागील काही दिवसांत सोयाबीनचे दर वाढले आहेत. सोयाबीनला 4600 ते 4700 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे. आठवड्यापूर्वी हेच दर 4000 ते 4400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होते. आगामी काळात सोयाबीन 5000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठेल का? सोयाबीन दरवाढीमागे कोणते तीन महत्त्वाचे घटक कारणीभूत आहेत पाहुयात.
मराठवाड्यातील महत्त्वाची सोयाबीन बाजारपेठ जालन्यात मंगळवारी 3 ते 4 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला 4700 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. सोयाबीन भाव हे आगामी काळात 5000 रुपये प्रति क्विंटल होऊ शकतात, अशी शक्यता व्यापारी अशोक पाचफुले यांनी वर्तवली आहे.
advertisement
अमेरिका आणि ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. सोयाबीन डीओसीला बाजारात मागणी वाढली आहे. त्याचबरोबर नाफेडमार्फत हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली आहे. यामुळे समितीत सोयाबीन आवक कमी झाली आहे. या तीन प्रमुख कारणांमुळे सोयाबीन दरात तेजी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ग्रीन गोल्ड सोयाबीन 5100 रुपये प्रति क्विंटल तर प्लांटवर सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन दर वाढीला पोषक स्थिती आहे. मकर संक्रांतीपर्यंत दर 5000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठतील, असा विश्वास अशोक पाचफुले यांनी व्यक्त केला.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 4:35 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Soybean Price : सोयाबीनच्या दरात मोठी उलथापालथ, आगामी काळात 5000 जाणार? मार्केटमधून अपडेट समोर









