Smartphone Usage Tips : फोन टेबलवर ठेवताना स्क्रीन वर ठेवावी की खाली? 99% टक्के लोक करतात 'ही' चूक!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Phone face down benefits and side effects : आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. काम असो, संवाद असो किंवा मनोरंजन. फोन कायम आपल्या आसपासच असतो. पण एक छोटासा प्रश्न अनेकांना पडतो, तो म्हणजे फोन टेबलवर ठेवताना स्क्रीन वर ठेवावी की खाली? तसा तर हा मुद्दा किरकोळ वाटतो, पण प्रत्यक्षात याचा आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे फोन फेस अप (स्क्रीन वर) ठेवावा की फेस डाउन (स्क्रीन खाली) चला पाहूया.
फोन टेबलवर ठेवताना स्क्रीन वर ठेवल्यास त्यामुळे आपले वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक बनते. बँकेचे मेसेज, ओटीपी, वैयक्तिक चॅट्स किंवा ऑफिसचे नोटिफिकेशन आजूबाजूला बसलेल्या कोणाच्याही नजरेत पडू शकतात. अनेकदा आपल्यालाच कळत नाही की स्क्रीनवर काय फ्लॅश झाले आणि कोणी ते पाहिले. स्क्रीन खाली ठेवली तर हा धोका आपोआप टळतो. आज ज्या काळात डिजिटल प्रायव्हसी मोठी चिंता बनली आहे, तिथे ही सवय तुमची खासगी माहिती सहज सुरक्षित ठेवते.
advertisement
मोबाईल फोनची नोटिफिकेशन सिस्टिम ही त्याची सर्वात मोठी ताकद असली तरी तीच अनेकदा कमजोरी ठरते. स्क्रीन वर असताना प्रत्येक वायब्रेशन किंवा लाइट आपले लक्ष वेधून घेते. फोन उचलायचा नसला तरी डोळे आणि मेंदू आपोआप त्याच्याकडे वळतात. स्क्रीन खाली ठेवल्याने हा दृश्य मोह कमी होतो आणि तुम्ही काम, अभ्यास किंवा संभाषणावर अधिक चांगले लक्ष केंद्रित करू शकता.
advertisement
फोन समोर असताना सतत स्क्रीन पेटत राहिली तर मेंदू कायम ‘अलर्ट मोड’मध्ये राहतो. यामुळे मानसिक थकवा, अस्वस्थता आणि तणाव वाढतो. स्क्रीन खाली ठेवल्याने मेंदूला हा संदेश मिळतो की सध्या फोन प्राथमिकता नाही. यामुळे मन अधिक रिलॅक्स राहते आणि समोरच्या वातावरणाशी चांगले कनेक्ट होता येते. कुटुंबासोबत वेळ घालवताना किंवा एकटे बसले असतानाही ही सवय ‘क्षणात जगायला’ शिकवते.
advertisement
मोबाईल फोनची स्क्रीन आणि कॅमेरा हे सर्वात महागडे आणि नाजूक भाग असतात. स्क्रीन वर असताना त्यावर पाणी, चहा-कॉफी किंवा अन्नाचे कण पडण्याचा धोका असतो. तसेच कॅमेरा लेन्स टेबलला घासल्यास हळूहळू खराब होऊ शकते. स्क्रीन खाली ठेवल्याने हे दोन्ही भाग सुरक्षित राहतात आणि फोन घसरून पडण्याची शक्यता देखील कमी होते, विशेषतः चोपड्या टेबलवर.
advertisement
advertisement
advertisement










