आत्म्याची आसक्ती आणि मोह: गरुड पुराणानुसार, शरीराचा नाश झाला तरी आत्मा लगेच परलोकात जात नाही. तो काही काळ आपल्या शरीराभोवती आणि नातेवाईकांभोवती घुटमळतो. जर कुटुंबातील सदस्य मागे वळून पाहतात, तेव्हा आत्म्याला वाटते की आपले कुटुंबीय अजूनही आपल्याशी जोडलेले आहेत. या मोहामुळे आत्म्याला मुक्ती मिळवताना किंवा पुढच्या प्रवासासाठी निघताना त्रास होतो.
advertisement
आत्म्याला होणारा त्रास: अंत्यसंस्कारानंतर आत्म्याची या जगाशी असलेली सर्व बंधने तुटणे आवश्यक असते. मागे वळून पाहणे हे 'दु:ख' आणि 'ओढ' व्यक्त करण्याचे लक्षण आहे. यामुळे मृताचा आत्मा अधिक भावूक होतो आणि मोहाच्या बंधनात अडकून पडतो, ज्यामुळे त्याला सद्गती मिळण्यात अडथळे येतात.
नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव: स्मशानभूमी ही नकारात्मक ऊर्जा आणि विविध सूक्ष्म शक्तींचे स्थान मानले जाते. मागे वळून पाहणे हे एक प्रकारचे निमंत्रण किंवा कमकुवत मनाचे लक्षण मानले जाते. शास्त्रानुसार, असे केल्याने नकारात्मक ऊर्जा किंवा तो आत्मा तुमच्यासोबत घरपर्यंत येऊ शकतो, अशी धारणा आहे.
मुक्तीच्या मार्गात अडथळा: हिंदू धर्मात 'मुक्ती' म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका. मागे वळून न पाहण्याचा अर्थ असा की, तुम्ही त्या व्यक्तीला या जगातून पूर्णपणे निरोप दिला आहे. हे आत्म्याला संकेत देते की आता त्याची या जगातील जबाबदारी संपली आहे आणि त्याने ईश्वराच्या मार्गावर पुढे जावे.
मानसिक बळ टिकवून ठेवण्यासाठी: प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर माणूस मानसिकदृष्ट्या खचलेला असतो. वारंवार जळत्या चितेकडे किंवा स्मशानाकडे पाहिल्याने मनातील दु:ख कमी होण्याऐवजी वाढत जाते. मागे वळून न पाहणे हे मानवी मनाला सावरण्यासाठी आणि 'वर्तमानात' परतण्यासाठी प्रेरित करते.
चुकीने मागे वळल्यास करायचे उपाय: जर कोणी चुकून मागे वळून पाहिले, तर गरुड पुराणात काही शुद्धीकरणाचे उपाय सांगितले आहेत. अशा व्यक्तीने घरी आल्यावर थेट घरात न जाता आधी कडुलिंबाचे पान चावून थुंकावे, पाणी किंवा अग्नीला स्पर्श करावा आणि स्नान करूनच घरात प्रवेश करावा. यामुळे नकारात्मकता दूर होते असे मानले जाते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
