TRENDING:

Garuda Purana: कधी ना कधी केलेले पाप! अकाली मृत्युची 5 कारणे, गरुड पुराणात आहे उल्लेख

Last Updated:

Garuda Purana: आपण जे काही चांगलं-वाईट कर्म करतो, त्याचा परिणाम फक्त याच जन्मात नाही, तर मृत्यूनंतरच्या प्रवासावरही होतो, असं भगवान विष्णूंनी गरुडाला समजावून सांगितल्याचा यात उल्लेख आहे. गरुड पुराणानुसार अशा काही चुका किंवा पापं आहेत..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्यापैकी अनेकांना माहीत असेलच हिंदू धर्मात गरुड पुराणाचं महत्त्व खूप मोठं आहे. गरुड पुराण फक्त एक धार्मिक पुस्तक नाही, तर जगण्याचं आणि मरण्याचं खरं गुपित यात सांगितलं आहे. आपण जे काही चांगलं-वाईट कर्म करतो, त्याचा परिणाम फक्त याच जन्मात नाही, तर मृत्यूनंतरच्या प्रवासावरही होतो, असं भगवान विष्णूंनी गरुडाला समजावून सांगितल्याचा यात उल्लेख आहे. गरुड पुराणानुसार अशा काही चुका किंवा पापं आहेत, ज्यांच्यामुळे माणसाचं आयुष्य कमी होतं आणि त्याला अकाली मृत्यूला सामोरे जावे लागू शकते.
News18
News18
advertisement

पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्वान लोक किंवा ब्राह्मणांचा अपमान करणं आणि हिंसा करणं. जो माणूस ज्ञानाचा आणि संस्कारांचा आदर करत नाही, त्याच्या आत्म्याचं नुकसान होतं. दुसरं मोठं पाप म्हणजे ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या आई-वडिलांचा, आपल्याला शिकवणाऱ्या गुरुंचा आणि देवाचा अपमान करणं.

advertisement

माघी अमावस्येला सालातील पहिलं सूर्यग्रहण; या 5 राशींचे नशीब मात्र लख्ख उजळणार

तसेच आई-वडिलांचं ऐकलं नाही किंवा त्यांच्याशी वाईट वागलं तर आयुष्यात खूप हाल सोसावं लागतं. तसंच परस्त्रीवर वाईट नजर ठेवणं, खोटं बोलणं, चोरी करणं किंवा मुक्या प्राण्यांची हत्या करणं या गोष्टी माणसाला अधोगतीकडे नेतात.

गरुड पुराण फक्त भीती दाखवत नाही, तर या चुका कशा सुधारायच्या हे सुद्धा सांगतं. आपल्याकडून काही वाईट घडलं असेल, तर देवाची भक्ती करणं, गंगा स्नान, दानधर्म करणं आणि आई-वडिलांची सेवा केल्यानं पापांचा भार कमी होतो. नेहमी खरं बोलणं, कुणालाही न दुखवणं आणि साधा आहार घेणं यामुळे मन आणि आत्मा दोन्ही शुद्ध राहतात.

advertisement

तयारी महाशिवरात्रीची! महादेवाच्या पिंडीवर या 5 गोष्टींनी अभिषेक करणे शुभफळदायी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सात वाजताच होतात मोबाईल आणि टीव्ही बंद,या गावाचा कौतुकास्पद निर्णय
सर्व पहा

थोडक्यात काय, तर आपलं आजचं जीवन आपल्या कर्माचा आरसा आहे; चांगलं वागलो तर सुख मिळतं आणि वाईट वागलो तर त्याचे परिणाम भोगावेच लागतात, असे त्यात सांगितले आहे.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Garuda Purana: कधी ना कधी केलेले पाप! अकाली मृत्युची 5 कारणे, गरुड पुराणात आहे उल्लेख
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल