फाल्गुन शुक्ल पौर्णिमा 2 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजून 32 मिनिटांनी सुरू होईल आणि 3 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजून 46 मिनिटांपर्यंत असेल. या पौर्णिमा तिथीच्या आधारावरच होळी दहन म्हणजेच होळी पेटवण्याचा मुहूर्त आणि धुलिवंदनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांतील होळीच्या तारखा
2025: 15 मार्च
2024: 25 मार्च
advertisement
2023: 08 मार्च
2022: 18 मार्च
2021: 29 मार्च
2020: 10 मार्च
महाराष्ट्रात होळी पेटवण्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. महाराष्ट्रात होळी पेटवण्याच्या परंपरेला खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार, पौर्णिमा तिथी सुरू झाल्यावर 2 मार्च, सोमवार रोजीच होळी पेटवली जाईल. जरी या दिवशी भद्रा काळ सुरू होत असला, तरी भद्रेच्या पुच्छ काळात होळी पेटवणे शुभ मानले जाते. त्यामुळे 2 मार्चच्या सायंकाळी मुहूर्तावर होळी पेटवून वाईट प्रवृत्तींचा नाश आणि अग्नी देवतेची पूजा केली जाईल.
3 मार्चला असेल धूलिवंदन -
होळी पेटवल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्च, मंगळवार रोजी धूलिवंदन साजरी केली जाईल. या दिवशी सकाळी धूलवड खेळण्याची परंपरा पाळली जाईल. विशेष म्हणजे, याच दिवशी दुपारी 3 वाजून 21 मिनिटांपासून चंद्रग्रहण सुरू होणार आहे, ज्याचा सूतक काळ सकाळी 9 वाजून 39 मिनिटांपासून लागेल. त्यामुळे ग्रहणाचा वेध लागण्यापूर्वीच सकाळी धुलिवंदनाचा आनंद घेणे योग्य ठरेल.
ग्रहण संपलं तरी या राशींवर काळी छाया 15 दिवस राहणार; भलत्याच अडचणींचा त्रास
4 मार्चचे महत्त्व -
ग्रहणामुळे काही ठिकाणी सण साजरा करण्याबाबत मतभिन्नता असू शकते, मात्र पंचांगानुसार 2 ला होळी आणि 3 ला धुलिवंदन असेच नियोजन दिसत आहे. 4 मार्च रोजी पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रांचा शुभ संयोग असल्याने हा काळ देखील धार्मिक कार्यासाठी चांगला असेल.
