TRENDING:

होळीला लागणार 'डबल जॅकपॉट'! 'या' खास राजयोगामुळे 3 राशींचे लोक होणार मालामाल, होणार पैशांचा वर्षाव

Last Updated:

रंगांचा सण होळी यंदा केवळ आनंदच नाही, तर काही राशींच्या आयुष्यात 'सोन्याचे दिवस' घेऊन येणार आहे. 3 मार्च 2026 रोजी होणाऱ्या होळीच्या मुहूर्तावर आकाशात ग्रहांची अशी काही दुर्मिळ स्थिती निर्माण होत आहे, ज्यामुळे 'डबल राजयोग' तयार होत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Holi 2026 : रंगांचा सण होळी यंदा केवळ आनंदच नाही, तर काही राशींच्या आयुष्यात 'सोन्याचे दिवस' घेऊन येणार आहे. 3 मार्च 2026 रोजी होणाऱ्या होळीच्या मुहूर्तावर आकाशात ग्रहांची अशी काही दुर्मिळ स्थिती निर्माण होत आहे, ज्यामुळे 'डबल राजयोग' तयार होत आहेत. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, शनी आणि मंगळाच्या विशेष स्थितीमुळे शश राजयोग आणि रुचक राजयोग यांचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. या महासंयोगाचा सर्वाधिक फायदा मेष, तूळ आणि मकर या तीन राशींना होणार असून, त्यांच्यासाठी हा काळ एखाद्या आर्थिक लॉटरीपेक्षा कमी नसेल.
News18
News18
advertisement

'डबल राजयोग' म्हणजे काय?

तिषशास्त्रात राजयोग म्हणजे ग्रहांची अशी स्थिती जी व्यक्तीला राजासारखे ऐश्वर्य मिळवून देते. जेव्हा शनी स्वराशीत किंवा उच्च राशीत केंद्रस्थानी असतो, तेव्हा शश राजयोग बनतो. हा योग स्थिरता, सत्ता आणि प्रचंड धनसंपत्ती देतो. जेव्हा मंगळ स्वतःच्या राशीत किंवा उच्च राशीत केंद्रस्थानी असतो, तेव्हा रुचक राजयोग निर्माण होतो. हा योग धैर्य, विजय आणि रिअल इस्टेटमधून मोठा नफा मिळवून देतो.

advertisement

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी ही होळी भाग्योदयाची ठरेल. तुमचा राशीस्वामी मंगळ शुभ स्थितीत असल्याने तुम्हाला दुप्पट लाभ मिळतील. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. शेअर मार्केट किंवा लॉटरीसारख्या गुंतवणुकीतून मोठा नफा होण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती आणि पगारवाढीचे प्रबळ योग आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे.

advertisement

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी शनीची विशेष कृपा राहणार आहे. डबल राजयोगामुळे तुमच्या आयुष्यातील सुख-सुविधा वाढतील. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला मोठी डील मिळू शकते. परदेशातून धनलाभ होण्याचे संकेत आहेत. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.

मकर

मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ 'गोल्डन पीरियड' ठरणार आहे. राजयोगाच्या प्रभावामुळे तुमच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. तुमचे विरोधक परास्त होतील आणि तुम्ही कामाच्या ठिकाणी नेतृत्व कराल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुम्ही कधी खाल्लीये का मासे चकली? दुर्गा यांचा व्यवसाय हिट,महिन्याला 1 लाख कमाई
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
होळीला लागणार 'डबल जॅकपॉट'! 'या' खास राजयोगामुळे 3 राशींचे लोक होणार मालामाल, होणार पैशांचा वर्षाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल