advertisement

Success Story : तुम्ही कधी खाल्लीये का मासे चकली? दुर्गा यांचा व्यवसाय ठरतोय हिट, महिन्याला 1 लाख कमाई

Last Updated:

दुर्गा बिरोटे गेल्या वर्षभरापासून मत्स्य मूल्यवर्धित लोणच्यासह विविध प्रकारचे पदार्थ तयार करत आहेत आणि त्यांची विक्री करतात. त्यात लोणचे, शेव, चकली, पापड यांसारखे पदार्थ विशेष लक्षात येतात.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील वैसपूर येथील दुर्गा बिरोटे गेल्या वर्षभरापासून मत्स्य मूल्यवर्धित लोणच्यासह विविध प्रकारचे पदार्थ तयार करत आहेत आणि त्यांची विक्री करतात. त्यात लोणचे, शेव, चकली, पापड यांसारखे पदार्थ विशेष लक्षात येतात. सर्व पदार्थ तयार करताना मासे स्वच्छ करून, त्याचे वरचे भाग आणि काटे काढले जातात. लोणच्यात अद्रक, लसूण, मोहरी, हिरवी मिरची, मीठ आणि हळद वापरून हे स्वादिष्ट मत्स्य लोणचे बनवले जातात. या व्यवसायामध्ये एकूण 13 महिला काम करतात, त्यांची महिन्याला 1 लाख कमाई होते. याबरोबरच दुर्गा बिरोटे यांच्याकडून लोणचे आणि इतर पदार्थांबद्दल सविस्तर माहिती लोकल 18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
मासे लोणचे बनवायचे कसे?
घरी किंवा हॉटेल सारख्या ठिकाणी मासे लोणचे बनवायचे झाल्यास सुरुवातीला मासे स्वच्छपणे पाण्याने धुवून घेणे, त्यानंतर त्याच्या वरचे सालटे आणि काटे बाजूला करणे, माशांचे छोटे पीस करणे त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट त्या पिसांना लावायचे, त्यानंतर ते थोडा वेळ फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे, मासे पीस थंड झाल्यानंतर गरम झालेल्या तेलात तळून काढायचे. तळून झाल्यानंतर लोणचे मसाला, मोहरी, हळद, मीठ, मिरची पावडर अशा मसाल्यांचा वापर करावा असे दुर्गा बिरोटे यांनी सांगितले.
advertisement
मासे चकली कशी बनवायची?
मासे चकली किंवा शेव बनवायची झाल्यास आयते चकली पीठ आणायचे, मासे गरम पाण्यामध्ये मीठ टाकून उकडून घ्यायचे, त्यानंतर माशांचे काटे काढून त्या पिठामध्ये पिस मिक्स करायचे, आणि पुढील चकलीची प्रक्रिया करायची याबरोबरच मासे शेव मध्ये देखील बेसन पीठ वापरून याच पद्धतीने तयार करता येते. मासे वापरून तयार केलेली चकली, शेव ही लहान मुलांसाठी पौष्टिक ठरते, असेही लहान मुलांना काट्यामुळे मासे खाण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे हे पदार्थ खाण्यास सोपे आणि आरोग्य दृष्ट्या हितकारक आहेत, आम्ही सध्या 13 महिला मिळून हा व्यवसाय करत आहोत, इतर महिलांना देखील या व्यवसायामध्ये संधी आहे त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय करावा असेही बिरोटे यांनी म्हटले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : तुम्ही कधी खाल्लीये का मासे चकली? दुर्गा यांचा व्यवसाय ठरतोय हिट, महिन्याला 1 लाख कमाई
Next Article
advertisement
Gold And Silver: रिस्क-ऑफ मोड ऑन! सोन्याला लागणार आग, दर ऐकून चक्कर येईल; चांदीचा 'महाविस्फोट' फिक्स
सोन्याला लागणार आग, दर ऐकून चक्कर येईल; चांदीचा 'महाविस्फोट' फिक्स
  • सोन्याचा 'महाभडका'

  • तोळ्याचा भाव २ लाखांकडे

  • चांदी ३ लाखांच्या पार जाणार

View All
advertisement