advertisement

BBM6 मध्ये लागणार ग्लॅमरचा तडका! प्रसिद्ध हिंदी TV अभिनेत्रीची वाईल्ड कार्ड एन्ट्री, राखी सावंतला देणार टक्कर?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Wild Card: शोमध्ये खरी रंगत भरण्यासाठी मेकर्सनी आता एक मोठी खेळी खेळली आहे. आज रात्रीच्या भागात घरात तीन नवीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे.
1/9
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनने सध्या अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. रितेश देशमुखचा कडक अंदाज, सदस्यांमधील राडे आणि नवनवीन टास्कमुळे हा शो सध्या टीआरपीच्या शिखरावर आहे.

2/9
१७ स्पर्धकांपासून सुरू झालेला हा प्रवास आता ५० दिवसांच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. आतापर्यंत राधा पाटील, सोनाली राऊत, ओमकार राऊत आणि नुकताच बाहेर पडलेला रोशन भजनकर अशा अनेक तगड्या स्पर्धकांनी घराचा निरोप घेतला आहे.

3/9
पण, शोमध्ये खरी रंगत भरण्यासाठी मेकर्सनी आता एक मोठी खेळी खेळली आहे. आज रात्रीच्या भागात घरात तीन नवीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे.

4/9
यातलं सर्वात चर्चेतलं नाव म्हणजे अभिनेत्री रेवा कौरसे. हिंदी टेलिव्हिजन विश्वात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी रेवा आता मराठी बिग बॉसच्या रणांगणात उतरणार आहे.

5/9
रेवाने अर्जुन बिजलानीच्या गाजलेल्या 'प्यार का पहला अध्याय: शिव शक्ती' आणि 'दीवानियत' सारख्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

6/9
अभिनयात येण्यापूर्वी रेवा एक व्यावसायिक मॉडेल होती. सोशल मीडियावरही तिची जबरदस्त क्रेझ आहे; इन्स्टाग्रामवर तिचे १ लाखांहून अधिक फॉलोअर्स असून तिच्या ग्लॅमरस फोटोंनी ती नेहमीच चर्चेत असते.

7/9
काही दिवसांपूर्वीच राखी सावंतने वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेऊन घरातली ऊर्जा बदलून टाकली होती. आता रेवा कौरसेच्या येण्याने घरातील समीकरणं पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.

8/9
एका बाजूला राखीचं रांगडं मनोरंजन आणि दुसऱ्या बाजूला रेवाचं स्टायलिश व्यक्तिमत्व, असा दुहेरी तडका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

9/9
तगडे टास्क, कॅमेऱ्याची नजर आणि इतर सदस्यांशी होणारे खटके रेवा कशी हाताळणार, हे पाहणं रंजक ठरेल. ती कोणाशी मैत्री करणार आणि कोणाशी भिडणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Gold And Silver: रिस्क-ऑफ मोड ऑन! सोन्याला लागणार आग, दर ऐकून चक्कर येईल; चांदीचा 'महाविस्फोट' फिक्स
सोन्याला लागणार आग, दर ऐकून चक्कर येईल; चांदीचा 'महाविस्फोट' फिक्स
  • सोन्याचा 'महाभडका'

  • तोळ्याचा भाव २ लाखांकडे

  • चांदी ३ लाखांच्या पार जाणार

View All
advertisement