advertisement

'तो हे डिझर्व्ह करतो', घटस्फोटाच्या अर्जात पत्नीचे गंभीर आरोप, विजयबद्दल तृषा कृष्णनचं 'ते' स्टेटमेंट व्हायरल, नक्की काय म्हणाली?

Last Updated:
Trisha Krishnan-Thalapathy Vijay: संगीताने कोर्टात सादर केलेल्या अर्जात विजयवर विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप केल्याने नेटकऱ्यांच्या नजरा एकाच नावावर खिळल्या आहेत, ती म्हणजे अभिनेत्री तृषा कृष्णन.
1/12
तमिळ सुपरस्टार थलापती विजय आणि त्याची पत्नी संगीता सोर्णलिंगम यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने सध्या संपूर्ण दाक्षिणात्य सिनेसृष्टी हादरली आहे.

2/12
संगीताने कोर्टात सादर केलेल्या अर्जात विजयवर विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप केल्याने नेटकऱ्यांच्या नजरा एकाच नावावर खिळल्या आहेत, ती म्हणजे अभिनेत्री तृषा कृष्णन.

3/12
या वादाच्या आगीत तेल ओतण्याचं काम केलंय तृषाच्या एका जुन्या व्हिडिओने, जो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय.

4/12
गेल्या वर्षी दुबईत पार पडलेल्या 'सायमा' (SIIMA) अवॉर्ड्समधील हा व्हिडिओ आहे. यावेळी तृषाला विजयच्या राजकीय प्रवेशाबद्दल आणि त्याच्या यशाबद्दल विचारण्यात आलं होतं.

5/12
तेव्हा तृषा अतिशय आनंदाने म्हणाली होती,
तेव्हा तृषा अतिशय आनंदाने म्हणाली होती, "विजय जे काही स्वप्न पाहतील, ते पूर्ण व्हावं. कारण ते या सर्व सुखाचे आणि यशाचे खरोखरच हक्कदार आहेत."
advertisement
6/12
आज जेव्हा विजयचा संसार मोडकळीस आल्याच्या बातम्या येत आहेत, तेव्हा तृषाचे हे शब्द आणि तिची विजयबद्दलची ओढ नेटकऱ्यांसाठी चर्चेचा मोठा विषय ठरली आहे. अनेकांनी याला
आज जेव्हा विजयचा संसार मोडकळीस आल्याच्या बातम्या येत आहेत, तेव्हा तृषाचे हे शब्द आणि तिची विजयबद्दलची ओढ नेटकऱ्यांसाठी चर्चेचा मोठा विषय ठरली आहे. अनेकांनी याला "मैत्रीपलीकडचं नातं" असं म्हणायला सुरुवात केली आहे.
advertisement
7/12
विजय आणि तृषा या जोडीने तमिळ सिनेमात 'घिल्ली' आणि 'थिरुपाची' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की, खऱ्या आयुष्यातही त्यांच्यात काहीतरी शिजतंय, अशा अफवा २००४ सालापासूनच सुरू होत्या.

8/12
'कुरुवी' चित्रपटानंतर या जोडीने तब्बल १५ वर्षे एकत्र काम केलं नाही. असं म्हटलं जातं की, घराघरांत चर्चा सुरू झाल्यामुळे विजयच्या कुटुंबीयांनीच त्याला तृषापासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता.

9/12
तब्बल १५ वर्षांनंतर २०२३ मध्ये लोकेश कनगराजच्या 'लिओ' चित्रपटात ही जोडी पुन्हा एकत्र दिसली. चाहत्यांसाठी हा मोठा आनंद असला तरी, याच रीयूनियनमुळे जुन्या गॉसिप्सना पुन्हा नव्याने धुमारे फुटले.

10/12
त्यातच संगीता गेल्या काही काळापासून विजयच्या कोणत्याही कार्यक्रमात दिसत नसल्याने संशयाची पाल अधिकच चुकचुकली होती.

11/12
१९९९ मध्ये विजय आणि संगीता यांचा विवाह झाला होता. त्यांना जॅसन आणि दिव्या ही दोन मुलेही आहेत. विजयने नेहमीच आपलं वैयक्तिक आयुष्य कॅमेऱ्यापासून लांब ठेवलं आहे.

12/12
घटस्फोटाचा अर्ज दाखल झाला असला, तरी अद्याप विजय किंवा तृषा यांपैकी कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, संगीताने अर्जात 'एका अभिनेत्रीमुळे मानसिक त्रास झाल्याचा' जो उल्लेख केला आहे, त्याचा रोख तृषाकडेच असल्याचा कयास लावला जात आहे.

How Khamenei Killed: एका सीक्रेट मीटिंगने अयातुल्ला खामेनेईंचा घात केला, थरकाप उडवणारा अंत; 30 बॉम्बांचा महाप्रहारची इनसाइड स्टोरी
एका सीक्रेट मीटिंगने अयातुल्ला खामेनेईंचा घात केला, थरकाप उडवणारा अंत
  • मोसादची अचूक वेळ आणि अमेरिकेचा फास

  • गुप्त बैठकीत घुसून खामेनेईंचा खात्मा

  • अभेद्य समजल्या जाणाऱ्या संकुलाची राखरांगोळी

View All
advertisement