advertisement

अजित पवार सकाळी उठल्यानंतर पहिला फोन कोणाला करायचे? सुनेत्रा वहिनींनी पहिल्यांदाच सांगितलं दादांचं डेली रुटीन

Last Updated:

अजित पवार नेहमीच पहाटेच्या सुमारास कामाला करायचे. दादांची सकाळी कशी सुरू व्हायची याविषयीची एक आठवण सुनेत्रा पवार यांनी सांगितली.

News18
News18
पुणे :  महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले आणि गेले, पण ज्यांच्या नावाचा दरारा मंत्रालयातील सहाव्या मजल्यापासून ते गावच्या चावडीपर्यंत सारखाच आहे, असे एकमेव नाव म्हणजे अजित पवार. अजित पवारांची कार्यशैली ही कोणत्याही कॉर्पोरेट मॅनेजरला लाजवेल अशी होती. दादा नेहमीच पहाटेच्या सुमारास कामाला करायचे. सकाळीत अजित पवार फाईल्सचा निपटारा करत असतात किंवा प्रकल्पांच्या जागेवर जाऊन पाहणी करत असतात. सकाळी 7 वाजता अधिकाऱ्यांची बैठक घेणे हा त्यांचा शिरस्ता होता. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माळेगाव कारखान्याला भेट दिली. त्यावेळी त्यांनी दादांची सकाळी कशी सुरू व्हायची याविषयीची एक आठवण सांगितली.
दिवंगत अजित पवार हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी ब वर्ग गटातून निवडून आले होते. पण त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्यांच्या जागी आता त्यांच्या पत्नी तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ब वर्ग गटातून बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यानुसार, आज त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात येणार होती. त्यासाठी सुनेत्रा पवार आज सकाळीच कारखान्यावर पोहोचल्याही होत्या. पण निवडणूक निर्णय अधिकारी आज अचानक आजारी पडल्यामुळे ऐनवेळी ही निवड लांबणीवर पडली . त्यावेळी दादा सकाळी कोणाला फोन करायचे याविषयी सांगितले.
advertisement

कारखान्याबाबत सखोल माहीत नसली तरी माझी तोंड ओळख : सुनेत्रा पवार

अनेक कारखान्यांना मी पण अधून मधून भेट देत होते. मला कारखान्याबाबत सखोल माहीत नसली तरी माझी तोंड ओळख आहे. त्यामुळे काम करताना जरी अडचणी आल्या तरी सहकाऱ्यांमुळे अशक्य होणार नाही. माझ्याकडून कुठल्याही प्रकारच्या ना आवडणाऱ्या गोष्टी घडणार नाही त्याची मी काळजी घेईल. कारखाना कसा चांगला चालेल याकडे माझं लक्ष असेल असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement

सकाळी पहिला फोन अजित पवार कोणाला करायचे? 

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, गेली काही वर्षे अजितदादांची सकाळ कारखान्याच्या एमडींना फोन करण्यापासून सुरू व्हायची. अनेकदा मीही त्यांच्या सोबत विविध कारखान्यांना भेटी दिल्या आहेत. कारखान्याबाबत सखोल तांत्रिक माहिती नसली तरी माझी तोंडओळख आहे. त्यामुळे काम करताना अडचणी आल्या तरी सहकाऱ्यांच्या मदतीने त्या सोडवता येतील, याचा मला विश्वास आहे.
advertisement

दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार : सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याला देशातील अग्रगण्य साखर कारखान्यांच्या पंक्तीत उभे करण्याचे स्वप्न अजितदादांनी उराशी बाळगले होते. त्या दिशेने त्यांनी सातत्याने प्रयत्न करत होते. चेअरमन झाल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी अनेक गोष्टी कारखान्यासाठी केल्या होत्या . अशा पद्धतीने मला इथे यावे लागेल असे स्वप्नातही वाटले नाही. दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. कारखान्याचे सभासद, अधिकारी, कर्मचारी आपण सगळेच शेतकरी या सगळ्यांच्या भल्यासाठी दादांनी जे ठरवले आहे, त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी सर्वांच्या सहकार्याने नक्कीच प्रयत्न करेन, असा शब्द सुनेत्रा पवार यांनी दिला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवार सकाळी उठल्यानंतर पहिला फोन कोणाला करायचे? सुनेत्रा वहिनींनी पहिल्यांदाच सांगितलं दादांचं डेली रुटीन
Next Article
advertisement
How Khamenei Killed: एका सीक्रेट मीटिंगने अयातुल्ला खामेनेईंचा घात केला, थरकाप उडवणारा अंत; 30 बॉम्बांचा महाप्रहारची इनसाइड स्टोरी
एका सीक्रेट मीटिंगने अयातुल्ला खामेनेईंचा घात केला, थरकाप उडवणारा अंत
  • मोसादची अचूक वेळ आणि अमेरिकेचा फास

  • गुप्त बैठकीत घुसून खामेनेईंचा खात्मा

  • अभेद्य समजल्या जाणाऱ्या संकुलाची राखरांगोळी

View All
advertisement