T20 World Cup : वेस्ट इंडिजविरुद्ध सूर्याने 'ब्रम्हास्त्र' बाहेर काढलंच नाही, टॉसआधीच टीम इंडियाची मोठी चूक!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया सुपर-8 मधला त्यांचा शेवटचा सामना खेळत आहे. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी भारताला हा सामना जिंकावाच लागणार आहे.
advertisement
advertisement
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत 4 सामने झाले आहेत, यातल्या एकाच सामन्यात भारताचा विजय झाला तर 3 सामने वेस्ट इंडिजने जिंकले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 30 सामने झाले, यातल्या 19 सामन्यात भारताचा आणि 10 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा विजय झाला.
advertisement
वेस्ट इंडिजच्या टीमला स्पिन बॉलिंगसमोर खेळताना अडचणी येतात हा इतिहास आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध कुलदीप यादव हा भारताचा सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला आहे. कुलदीपची गुगली वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना समजत नाही, हेदेखील बऱ्यावेळा दिसून आलं आहे, पण त्याला महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियामध्ये संधी मिळाली नाही.
advertisement
advertisement







