advertisement

T20 World Cup : वेस्ट इंडिजविरुद्ध 'डू ऑर डाय', सूर्याने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण?

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात करो या मरो चा सामना होत आहे. या सामन्यात विजय मिळवलेली टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल.
1/7
सुपर-8 मध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला, त्यानंतर टीम इंडियाने झिम्बाब्वेला धूळ चारली. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजनेही झिम्बाब्वेला पराभूत केलं पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना पराभवाचा धक्का बसला, त्यामुळे दोन्ही टीम 2-2 पॉईंट्सवर आहेत.

2/7
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये 4 मॅच झाल्या आहेत, यातल्या 3 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा विजय झाला, तर टीम इंडियाला फक्त एकच सामना जिंकता आला.

3/7
दुसरीकडे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 30 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच झाल्या आहेत, यापैकी भारताचा 19 सामन्यांमध्ये तर वेस्ट इंडिजचा 10 सामन्यांमध्ये विजय झाला आहे.

4/7
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

5/7
“आज आम्ही पहिले बॉलिंग करू. खेळपट्टी चांगली दिसतेय. हे मैदान रनचा पाठलाग करण्यासाठी ओळखलं जातं, आणि खेळ जसा पुढे जाईल तशी खेळपट्टी आणखी चांगली होईल, त्यामुळे आव्हानाचा पाठलाग करणं हा चांगला पर्याय आहे. आधीच वातावरण उत्साही आहे आणि प्रेक्षकांसाठी आम्ही चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू. मागील सामन्यात आम्ही सर्व बाबतीत योग्य कामगिरी केली”, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.

6/7
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात खेळलेली टीमच वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात खेळणार आहे. या सामन्यात आम्ही टीममध्ये कोणतेही बदल केले नसल्याची प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली आहे.

7/7
भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह

How Khamenei Killed: एका सीक्रेट मीटिंगने अयातुल्ला खामेनेईंचा घात केला, थरकाप उडवणारा अंत; 30 बॉम्बांचा महाप्रहारची इनसाइड स्टोरी
एका सीक्रेट मीटिंगने अयातुल्ला खामेनेईंचा घात केला, थरकाप उडवणारा अंत
  • मोसादची अचूक वेळ आणि अमेरिकेचा फास

  • गुप्त बैठकीत घुसून खामेनेईंचा खात्मा

  • अभेद्य समजल्या जाणाऱ्या संकुलाची राखरांगोळी

View All
advertisement