advertisement

Kokan Railway Jobs: खुशखबर! कोकण रेल्वेत विविध पदांसाठी भरती; या पदांसाठी होणार भरती; अर्ज कसा करावा?

Last Updated:

कोकण रेल्वेमध्ये इंजिनियरिंग आणि डिप्लोमा करणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने नोकरभरती होणार आहे.

kokan railway recruitment 2026 government job for engineer and diploma student trainee apprentice post see application process
kokan railway recruitment 2026 government job for engineer and diploma student trainee apprentice post see application process
कोकण रेल्वेमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी चालून आल्या आहेत. जर तुम्ही सुद्धा कोकण रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कोकण रेल्वेमध्ये इंजिनियरिंग आणि डिप्लोमा करणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. 190 रिक्त पदांसाठी ही नोकरभरती होणार असून ऑनलाईन पद्धतीने ही नोकरभरती होत आहे. कोणकोणत्या रिक्त पदांसाठी ही नोकरभरती होतेय, जाणून घेऊया...
कोकण रेल्वेमध्ये 190 रिक्त पदांवर नोकरभरती होणार आहे. अप्रेंटिसशिप साठी ही नोकरभरती होणार आहे. पदवीधर अप्रेंटिसशिप, डिप्लोमा अप्रेंटिसशिप आणि सामान्य पदवीधर अप्रेंटिसशिप अशा तीन वेगवेगळ्या पदांसाठी ही नोकरभरती होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने नोकरभरती सुरू असून अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 21 मार्च 2026 आहे. शिवाय ऑनलाईन पद्धतीनेच पेमेंट सुद्धा अर्जदारांना करायचे आहे. तरुणांनी अर्ज भरण्यापूर्वी व्यवस्थित ऑनलाईन जाहिरात वाचूनच अर्ज करायचा आहे.
advertisement
पदवीधर अप्रेंटिसशिपसाठी सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि मॅकेनिकल असे विद्यार्थी अप्लाय करू शकणार आहेत. तर, डिप्लोमा अप्रेंटिसशिपसाठी सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि मॅकेनिकलचे विद्यार्थी अप्लाय करू शकणार आहेत. सामान्य पदवीधर अप्रेंटिसशिपसाठी BA, B.Sc, B.Com, BBA, BSMS, BJMC आणि BBS या पदवीचे विद्यार्थीही नोकरीसाठी अप्लाय करू शकणार आहेत. कोणकोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रतेची गरज आहे, याची सविस्तर माहिती अर्जदारांना जाहिरातीच्या PDF मध्ये मिळेल. या सर्व पदांसाठी 18 ते 25 वयोगटापर्यंतची वयोमर्यादा असून 01 जानेवारी 2026 पर्यंत अर्जदाराची नमूद केलेली वयोमर्यादा असावी.
advertisement
अनुसूचित जाती आणि जमातीतील उमेदवारांसाठी 5 वर्षांसाठी सूट आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षांसाठी सूट आहे. इतर उमेदवारांसाठी नमूद केलेली वयोमर्यादाच असणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 100 रूपये इतकी फी असेल. तर, अनुसूचित जाती- जमाती, आर्थिक दुर्बल घटक, अल्पसंख्याक आणि महिला यांना फी माफ आहे. भरतीच्या अधिसुचनेच्या जाहिरातीची लिंक बातमीमध्ये देण्यात आली आहे. सोबतच ऑनलाईन अर्जाचीही लिंक सुद्धा बातमीमध्ये देण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Kokan Railway Jobs: खुशखबर! कोकण रेल्वेत विविध पदांसाठी भरती; या पदांसाठी होणार भरती; अर्ज कसा करावा?
Next Article
advertisement
How Khamenei Killed: एका सीक्रेट मीटिंगने अयातुल्ला खामेनेईंचा घात केला, थरकाप उडवणारा अंत; 30 बॉम्बांचा महाप्रहारची इनसाइड स्टोरी
एका सीक्रेट मीटिंगने अयातुल्ला खामेनेईंचा घात केला, थरकाप उडवणारा अंत
  • मोसादची अचूक वेळ आणि अमेरिकेचा फास

  • गुप्त बैठकीत घुसून खामेनेईंचा खात्मा

  • अभेद्य समजल्या जाणाऱ्या संकुलाची राखरांगोळी

View All
advertisement