advertisement

Share Market On 2 March: गुंतवणूकदारांसाठी वैऱ्याची रात्र, उद्या सगळे कोसळणार फक्त एक शेअर वाचणार; भीतीने सर्वांची झोप उडाली

Last Updated:

Sensex and Nifty: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू आणि हॉर्मुज सामुद्रधुनीच्या नाकेबंदीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला 'पॅरालिसिस'चा झटका बसला असून, याचे भीषण पडसाद सोमवारी भारतीय शेअर बाजारात उमटणार आहेत.

News18
News18
मुंबई: मिडल ईस्टमध्ये अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आणि त्यावर इराणकडून झालेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईमुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता वाढली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. त्याचबरोबर होर्मुज सामुद्रधुनी बंद होण्याच्या बातम्यांमुळे कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने वाढू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी भारतीय शेअर बाजारात अनेक क्षेत्रांतील शेअर्स फोकसमध्ये राहण्याची चिन्हे आहेत.
कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यास त्याचा सर्वात थेट परिणाम ऑइल आणि एनर्जी क्षेत्रावर होतो. अपस्ट्रीम कंपन्या ज्या कच्चे तेल शोधणे आणि उत्पादन करणे यामध्ये कार्यरत आहेत, त्यांना दरवाढीचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे Oil and Natural Gas Corporation (ONGC) आणि Oil India Limited यांसारख्या कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. मात्र रिफायनिंग कंपन्यांवर दबाव वाढू शकतो, कारण महाग कच्चे तेल त्यांच्या नफ्याच्या मार्जिनवर परिणाम करते. Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL), Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) आणि Indian Oil Corporation यांचे शेअर्स दबावाखाली राहू शकतात.
advertisement
मिडल ईस्टमधील वाढत्या तणावामुळे एअरस्पेस बंद होणे किंवा उड्डाणे रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे एव्हिएशन कंपन्यांवर परिणाम होऊ शकतो. IndiGo आणि SpiceJet यांचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील. त्याचप्रमाणे पर्यटन आणि हॉटेल उद्योगावरही परिणाम जाणवू शकतो. Indian Hotels Company Limited, Ixigo आणि Yatra Online यांसारख्या कंपन्यांमध्येही हालचाल दिसू शकते.
advertisement
भूराजकीय तणाव वाढला की गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात आणि त्यामुळे सोने-चांदीच्या किंमती वाढण्याची शक्यता असते. याचा फायदा गोल्ड फायनान्स कंपन्यांना होऊ शकतो. Manappuram Finance आणि Muthoot Finance यांचे शेअर्स चर्चेत राहू शकतात. तसेच ज्वेलरी क्षेत्रातील Titan Company आणि Kalyan Jewellers यांच्याकडेही बाजाराचे लक्ष राहील.
डॉलर मजबूत झाल्यास मेटल क्षेत्रावर दबाव येऊ शकतो. गेल्या महिन्यात तेजी दाखवलेल्या Tata Steel आणि Vedanta Limited यांसारख्या शेअर्समध्ये चढ-उतार दिसू शकतात.
advertisement
दरम्यान इंडोनेशियाने ट्रक्सचा मोठा ऑर्डर थांबवल्याच्या बातम्यांमुळे ऑटो क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः कमर्शियल व्हेइकल व्यवसायात मोठा वाटा असलेल्या Tata Motors आणि Mahindra & Mahindra यांचे शेअर्स फोकसमध्ये राहतील.
मिडल ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवसाय असलेल्या कंपन्यांवरही बाजाराची नजर असेल. Larsen & Toubro, Welspun Corp आणि KEC International यांच्यातही अस्थिरता दिसू शकते.
advertisement
मध्यपूर्वेतील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या किंमतीतील संभाव्य वाढ आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी सेक्टरनिहाय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे ठरेल.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Share Market On 2 March: गुंतवणूकदारांसाठी वैऱ्याची रात्र, उद्या सगळे कोसळणार फक्त एक शेअर वाचणार; भीतीने सर्वांची झोप उडाली
Next Article
advertisement
How Khamenei Killed: एका सीक्रेट मीटिंगने अयातुल्ला खामेनेईंचा घात केला, थरकाप उडवणारा अंत; 30 बॉम्बांचा महाप्रहारची इनसाइड स्टोरी
एका सीक्रेट मीटिंगने अयातुल्ला खामेनेईंचा घात केला, थरकाप उडवणारा अंत
  • मोसादची अचूक वेळ आणि अमेरिकेचा फास

  • गुप्त बैठकीत घुसून खामेनेईंचा खात्मा

  • अभेद्य समजल्या जाणाऱ्या संकुलाची राखरांगोळी

View All
advertisement