TRENDING:

Numerology: खोटा कलंक लागतो, गुप्त शत्रुंचा त्रास! मोबाइल नंबरमध्ये या अंकांचे कॉम्बीनेशन मारक

Last Updated:

Mobile Number Combination : अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरच्या 10 अंकांमध्ये कुठेही 41 किंवा 14 चे संयोजन होत असेल आणि असा नंबर आपण साधारणपणे 1 ते 2 वर्षांपासून वापरत असाल तर त्यामुळे आता समस्या उद्भवू शकतात. हे संयोजन आपल्या जीवनावर का आणि कसे परिणाम करते ते जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मोबाईल फक्त संवादाचे साधन राहिलेला नसून जीवनाच्या प्रत्येक गोष्टीसाठी उपयुक्त झाला आहे. अंकशास्त्रानुसार, आपण वापरत असलेले अंक आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात, हे अंक आपल्या आरोग्यावर, मानसिक स्थितीवर आणि जीवनाच्या इतर पैलूंवर परिणाम करू शकतात. मोबाईल नंबर असो की, गाडी नंबर किंवा इतर महत्त्वाच्या अंकाचे संयोजन त्रासदायक ठरू शकते? ज्योतिषी, अंकशास्त्रज्ञ आणि वास्तु सल्लागार हिमाचल सिंह यांच्याकडून जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरच्या 10 अंकांमध्ये कुठेही 41 किंवा 14 चे संयोजन होत असेल आणि असा नंबर आपण साधारणपणे 1 ते 2 वर्षांपासून वापरत असाल तर त्यामुळे आता समस्या उद्भवू शकतात. हे संयोजन आपल्या जीवनावर का आणि कसे परिणाम करते ते जाणून घेऊया.

41 आणि 14 च्या संयोजनाचे कारण आणि परिणाम

advertisement

अंकशास्त्रानुसार, प्रत्येक संख्या एका विशिष्ट ग्रहाशी संबंधित असते. अंक 1 हा सूर्याचे प्रतिनिधित्व करतो, तर अंक 4 हा राहूचे प्रतिनिधित्व करतो. दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे तुमच्या जीवनात काही नकारात्मक बदल घडू शकतात. जीवनाची ऊर्जा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक असलेला सूर्य, राहूसारख्या अशुभ ग्रहाशी जोडला गेला तर तो व्यक्तीच्या जीवनात अडचणी निर्माण करू शकतो.

advertisement

भ्रम आणि फसवणुकीचा कारक राहू, सूर्यासोबत एकत्रित झाल्यास व्यक्तीच्या जीवनात अनेक अशुभ परिणाम आणतो. ज्यांच्या मोबाईल नंबरमध्ये 41 आणि 14 असे संयोजन आहे, त्यांच्यासाठी समस्या निर्माण करू शकते. या अंकांच्या जोडीमुळे अशा व्यक्तींना मानसिक ताण, आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक समस्या देखील निर्माण होऊ शकतात.

उद्भवू शकणाऱ्या समस्या

1. कर्जाची समस्या -

advertisement

असा नंबर वापरणाऱ्या व्यक्तीला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. बऱ्याच वेळा, हे लोक कर्जाच्या प्रकरणात अडकू शकतात आणि वेळेवर कर्ज फेडण्यात अडचणी येऊ शकतात.

2. खोटे आरोप -

या संयोजनामुळे, गैरसमजामुळे त्या व्यक्तीला आरोपांनाही सामोरे जावे लागू शकते. अशा लोकांना निर्दोष असतानाही कोणत्याही कृतीसाठी दोषी ठरवले जाऊ शकते. खोटा कलंक येऊ शकतो, या परिस्थितीमुळे मानसिक ताण वाढतो.

advertisement

3. गुप्त शत्रू - 41 आणि 14 या क्रमांकाच्या संयोजनाचा मोबाईल नंबर वापरणाऱ्या व्यक्तीभोवती गुप्त शत्रू देखील निर्माण होऊ शकतात. हे शत्रू कधीतरी हानी पोहोचवू शकतात, बाहेरून ते मित्र किंवा सहकाऱ्यांसारखे वाटतात, पण मागे फसवतात.

4. सरकारी समस्या

या अंकाच्या प्रभावामुळे एखाद्या व्यक्तीला सरकारी कामातही अडचणी येऊ शकतात. अनेकदा दुर्दैवाने किंवा गैरसमजामुळे त्याला सरकारी कार्यालयांमध्ये समस्यांना तोंड द्यावे लागते.

5. वडिलांसोबतच्या नात्यात दुरावा

या संयोजनामुळे वडील आणि मुलाच्या नात्यातही तणाव निर्माण होऊ शकतो. कधीकधी यामुळे पितृदोष देखील होऊ शकतो, ज्याचा कौटुंबिक जीवनावर परिणाम होतो.

झोपच नीट लागत नाही? शांत निद्रेसाठी म्हणावे हे प्रभावी मंत्र, वाईट स्वप्ने टळतात

संयोजन टाळण्याचसाठी उपाय - मोबाईल नंबरमध्ये 41 किंवा 14 चे संयोजन असेल तर समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही उपायांकडे लक्ष दिले पाहिजे.

- शक्य तितके कमी वापरा: असे अंक कोणत्याही गोष्टीमध्ये येणार नाहीत याची काळजी घ्या. तुम्ही ते जितके कमी वापराल तितका त्याचा तुमच्या जीवनावर कमी परिणाम होईल.

- नंबर बदला: जर तुम्हाला वाटत असेल की हे संयोजन तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण करत आहे, तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलण्याचा विचार करू शकता.

- नंबर निवडताना काळजी घ्या: नेहमी लक्षात ठेवा की मोबाईल नंबर निवडताना, तुम्ही त्याची अंकशास्त्राशी संबंधित वैशिष्ट्ये समजून घेतली पाहिजेत. विशेषतः, 41 आणि 14 सारखे संयोजन टाळा.

- कुंडली तपासा: तुमची कुंडली चांगल्या अंकशास्त्रज्ञाकडून तपासा आणि तुमच्यासाठी कोणता अंक भाग्यवान असेल हे शोधण्याचा प्रयत्न करा.

काम थांबणार नाही, पैसा छापण्याचा काळ! या राशींनी तयार रहा; मंगळ-बुध देणार भरभरून

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीमधून घर खर्च भागत नव्हता, दाम्पत्याने सुरू केला चपाती आणि भाकरी व्यवसाय, महिन्याची कमाई पाहाच
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: खोटा कलंक लागतो, गुप्त शत्रुंचा त्रास! मोबाइल नंबरमध्ये या अंकांचे कॉम्बीनेशन मारक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल