झोपण्यापूर्वी मंत्रजप करण्याचे फायदे -
मंत्र म्हणजे ध्वनीची एक लय असते. जेव्हा तुम्ही शांत मनाने एखादा मंत्र जपता, तेव्हा तुमचा श्वास संथ होतो आणि हृदयाचे ठोके संतुलित होतात. यामुळे मेंदू रिलॅक्स मोडमध्ये जातो आणि विनाकारण येणारे विचार कमी होऊन मनाला एक एकाग्रता मिळते.
मंत्रजपापूर्वी काय खाणे टाळावे?
केवळ मंत्र बोलून चालणार नाही, तर तुमच्या पोटाची स्थितीही झोपेवर परिणाम करते. जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ आणि जडपणा जाणवू शकतो, ज्यामुळे झोपताना अस्वस्थता वाढते. संध्याकाळनंतर घेतलेला कडक चहा किंवा कॉफी मेंदूला जागृत ठेवते, यामुळे झोपेची खोली कमी होते. पिझ्झा, बर्गर किंवा जास्त तेलकट पदार्थ पचायला वेळ लागतो, शरीर पचन प्रक्रियेत व्यस्त राहिल्याने झोप नीट लागत नाही. गोड खाल्ल्याने शरीरात अचानक ऊर्जा वाढते आणि नंतर कमी होते, यामुळे रात्री वारंवार जाग येऊ शकते. मद्यपानामुळे सुरुवातीला झोप लागल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात यामुळे झोपेचे नैसर्गिक चक्र पूर्णपणे बिघडते.
advertisement
रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचे प्रभावी मंत्र -
पहिला प्रभावी मंत्र म्हणजे शांती मंत्र 'ॐ शांतिः शांतिः शांतिः' हा आहे. हा मंत्र 3 वेळा म्हटल्याने मनाचा ताण हलका होतो. दिवसभराचा मानसिक थकवा दूर करण्यासाठी गायत्री मंत्र अत्यंत उपयुक्त मानला जातो, हा मंत्र अगदी संथ लयीत म्हणावा. जर तुम्हाला भीती वाटत असेल किंवा वाईट स्वप्ने पडत असतील, तर 'ॐ हं हनुमते नमः' हा हनुमान मंत्र संरक्षण देणारा मानला जातो. मनातील गुंतागुंत सोडवण्यासाठी आणि विचारांना शांत करण्यासाठी 'ॐ गं गणपतये नमः' या गणेश मंत्राचा जप करणे फायदेशीर ठरते.
लग्न जुळवताना कुंडलीत नाडीदोष असेल तर? पुढे जावे की तिथेच थांबायला हवे
मंत्रजप करण्याची योग्य पद्धत - मंत्रजप करण्यासाठी अंथरुणावर पाठीचा कणा ताठ ठेवून बसा आणि डोळे हलके मिटून घ्या. श्वासोच्छवास सामान्य ठेवा आणि कोणताही दिखावा न करता शांतपणे 11 किंवा 21 वेळा जप करा. चांगली झोप फक्त शरीर थकल्यावर येत नाही, तर ती मन आणि शरीर दोन्ही शांत झाल्यावर मिळते. हलका आहार, मोबाईलचा कमी वापर आणि काही मिनिटे मंत्रजप या सवयी तुमची रात्र सुखाची करू शकतात.
