TRENDING:

Hast Rekha: वैवाहिक सुखच नाही! तळहातावरील विवाह रेषेवर अशी खुण नाहीये ना? जमलं तरी फसवणुकीचा धोका

Last Updated:

Astrology Marathi : तुमच्या नशिबात नेमका कसा जोडीदार लिहिलाय किंवा तुमची लव्ह लाईफ कशी असेल, याचं गुपित चक्क तुमच्या हाताच्या तळव्यात दडलेलं आहे. हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार, आपल्या हातावरच्या रेषा भविष्यातल्या नात्यांबद्दल खूप काही सांगून जातात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्याच्या या धावपळीच्या आयुष्यात एखादा समजूतदार आणि खंबीर जोडीदार मिळाला ना, तर खडतर रस्ताही सोपा वाटायला लागतो. सुखी संसार फक्त मनाला उभारी देत नाही, तर जगण्यात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी भरतो. पण तुम्हाला माहितीये का? तुमच्या नशिबात नेमका कसा जोडीदार लिहिलाय किंवा तुमची लव्ह लाईफ कशी असेल, याचं गुपित चक्क तुमच्या हाताच्या तळव्यात दडलेलं आहे. हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार, आपल्या हातावरच्या रेषा भविष्यातल्या नात्यांबद्दल खूप काही सांगून जातात. आपल्या हातावरच्या रेषा तुमच्या लग्नाबद्दल काय संकेत देतात ते सोप्या भाषेत समजून घेऊया.
News18
News18
advertisement

कुठे असते विवाह रेषा?

आपल्या हाताचं जे सर्वात छोटं बोट असतं ज्याला आपण करंगळी म्हणतो, त्याच्या अगदी खाली एक छोटा उंचवटा असतो, त्याला बुध पर्वत म्हणतात. या उंचवट्यावर ज्या काही आडव्या रेषा दिसतात, त्यांनाच विवाह रेषा किंवा प्रेम रेषा म्हणतात. या रेषा तुमच्या लव्ह लाईफमध्ये किती गोडवा असेल हे सांगतात. जर इथे एकापेक्षा जास्त रेषा असतील, तर त्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रेमसंबंधांकडे इशारा करतात.

advertisement

प्रेम कहाणी अधुरी राहते?

असं कित्येकदा होतं की, जीवापाड प्रेम असूनही काही नाती लग्नापर्यंत पोहोचत नाहीत. जर एखाद्याच्या हातावर मंगळ आणि बुध पर्वतावर खूप जास्त फाटाफूट असेल किंवा तिथे बारीक-सारीक रेषांनी एकमेकांना कापलं असेल, तर समजावं की प्रेम प्रकरणात संघर्षाचे योग आहेत. अशा व्यक्तींना नात्यात वारंवार भावनिक धक्का बसू शकतो आणि काही वेळा त्यांची प्रेम कहाणी अर्धवट राहते.

advertisement

श्रीमंत घर आणि सुखी संसाराचे योग - तुमचं लग्न एखाद्या बड्या प्रस्थाकडे किंवा श्रीमंत घराण्यात होईल की नाही, हे सुद्धा तुमच्या रेषा सांगतात. जर तुमची विवाह रेषा पुढे जाऊन सूर्य रेषेला (अनामिका म्हणजेच रिंग फिंगरच्या खालची उभी रेषा) टेकली, तर समजा तुम्ही खूप नशीबवान आहात. अशा लोकांचं लग्न खूप प्रतिष्ठित, श्रीमंत आणि संपन्न कुटुंबात होतं. पण, जर लग्नाच्या रेषेच्या शेवटी दोन फाटे फुटत असतील, तर मात्र संसारात विचारांचे मतभेद किंवा दुरावा येण्याची शक्यता असते.

advertisement

मृत्युच्या आधी 6 महिन्यांपासून दिसतात अशा गोष्टी; आपली ओळखण्यात होते चूक

नात्यात स्थिरता आहे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रमजानमध्ये दिली जाते जकात, काय आहे या मागील प्रथा आणि महत्त्व? Video
सर्व पहा

तुमच्या लग्नाची रेषा किती स्पष्ट आहे, यावरून तुमचं नातं किती टिकेल हे समजतं. जर ही रेषा अधूनमधून तुटलेली असेल किंवा साखळीसारखी दिसत असेल, तर प्रेम आणि संसारात खूप चढ-उतार येऊ शकतात. अशा लोकांना नातं टिकवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. याउलट, ज्यांच्या हातावरची ही रेषा एकदम सरळ, स्पष्ट आणि कोणत्याही खाचाखूचांशिवाय असते, ते लोक खूप लकी असतात. हे एका सुखद, लांब आणि प्रेमळ वैवाहिक आयुष्याचं लक्षण मानलं जातं.

advertisement

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Hast Rekha: वैवाहिक सुखच नाही! तळहातावरील विवाह रेषेवर अशी खुण नाहीये ना? जमलं तरी फसवणुकीचा धोका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल