TRENDING:

Jyotish Tips: पगार जमा झाल्याचा मेसेज आल्याबरोबर पहिल्यांदा 'ही' गोष्ट करायची; आर्थिक स्थैर्य राहतं

Last Updated:

Jyotish Tips Marathi: ज्योतिषशास्त्रानुसार, डिजिटल स्वरूपात येणारा हा पगार एक प्रकारचा धनप्राप्ती योग मानला जातो, ज्याचा थेट संबंध बुध आणि शनी या ग्रहांच्या ऊर्जेशी असतो. आपल्या खात्यात पगार जमा झाल्याचा मेसेज आल्यावर ज्योतिषीयदृष्ट्या नेमके काय करावे..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महिनाखेर पगार जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला की मनाला छान वाटणं स्वाभाविक आहे. पण ज्योतिषशास्त्रानुसार, डिजिटल स्वरूपात येणारा हा पगार एक प्रकारचा धनप्राप्ती योग मानला जातो, ज्याचा थेट संबंध बुध आणि शनी या ग्रहांच्या ऊर्जेशी असतो. आपल्या खात्यात पगार जमा झाल्याचा मेसेज आल्यावर ज्योतिषीयदृष्ट्या नेमके काय करावे आणि कोणते आध्यात्मिक नियम पाळावेत, याविषयीची ज्योतिष तज्ज्ञांनी दिलेली माहिती पाहुया.
News18
News18
advertisement

पगाराचा मेसेज पाहिल्यावर सर्वात आधी मनातल्या मनात "ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नमः" या मंत्राचा किमान तीन वेळा उच्चार करावा. हा मंत्र केवळ नामस्मरण नसून तो मिळालेल्या धनाला तुमच्या आयुष्यात स्थैर्य देण्याचे काम करतो. पगार जमा झाल्याचा मेसेज शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ओपन करावा आणि त्या क्षणी लक्ष्मी मातेचे मनापासून स्मरण करावे. स्वामीशक्ती ज्योतिष या इन्स्टाग्राम पेजवर याविषयी माहिती देण्यात आली आहे.

advertisement

आर्थिक प्रगतीसाठी पाळा हे काही शुभ नियम -

कुबेर-लक्ष्मी पूजन: पगार जमा झाल्यावर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी घराच्या उत्तर दिशेला बसून लक्ष्मीचा फोटो आणि कुबेराची प्रतिमा ठेवून दिवा लावावा.

तुळशीची सेवा: तुळस हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे या दिवशी तुळशीला आवर्जून पाणी घालून नमस्कार करावा.

दानाचे महत्त्व: हाती आलेल्या धनाचा ओघ प्रवाहित राहण्यासाठी पगारातील काही भाग आई-वडिलांना, वृद्ध व्यक्तींना द्यावा किंवा मंदिर आणि गरजूंसाठी बाजूला ठेवावा.

advertisement

ग्रहांची उपासना: बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करून "ॐ बुधाय नमः" म्हणावे, तसेच शनिवारी शनी देवाला काळ्या तिळाचे तेल किंवा काळी उडीद डाळ दान करावी.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

पगार आल्यावर या गोष्टी टाळणे ठरेल हितकारक - तुमच्या आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे येऊ नयेत म्हणून काही गोष्टी टाळणे अत्यंत गरजेचे आहे. पगार जमा होण्याच्या दिवशी कोणाशीही वाद घालणे, राग व्यक्त करणे किंवा नकारात्मक बोलणे टाळावे. विशेष म्हणजे, पगार आल्याबरोबर लगेच संपूर्ण खर्चाचे नियोजन करू नका, काही दिवस थांबणे योग्य ठरते. ऑनलाइन व्यवहार करताना मनात चिंता किंवा राग ठेवू नका, कारण यामुळे बुद्धीचा कारक असलेला बुध ग्रह अस्थिर होऊ शकतो आणि त्याचे परिणाम तुमच्या आर्थिक नियोजनावर होऊ शकतात. मिळालेल्या धनाचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त केल्यास लक्ष्मी स्थिर राहते आणि कुटुंबाची आर्थिक प्रगती होते.

advertisement

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Jyotish Tips: पगार जमा झाल्याचा मेसेज आल्याबरोबर पहिल्यांदा 'ही' गोष्ट करायची; आर्थिक स्थैर्य राहतं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल