रेवती नक्षत्रात शनीचा प्रभाव
17 मे 2026 रोजी शनि ग्रह रेवती नक्षत्रात गोचर करणार आहे आणि 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत याच नक्षत्रात राहील. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध आहे, त्यामुळे या काळात बुद्धी, नियोजन आणि संवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये विशेष परिणाम पाहायला मिळू शकतात. शनीचा हा बदल संयम राखणाऱ्या आणि मेहनत करणाऱ्यांसाठी फलदायी ठरू शकतो. बऱ्याच काळापासून रेंगाळलेल्या कामांमध्ये हळूहळू प्रगती होणे शक्य आहे.
advertisement
सिंह राशीच्या लोकांना महत्त्वाच्या कामात सहकार्य मिळेल, यशाचे योग आहेत. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ मित्र आणि कुटुंबाची साथ मिळवून देणारा असेल. व्यवसायात नवीन भागीदारी किंवा करार फायदेशीर ठरू शकतो. आरोग्यात सुधारणा होईल आणि मानसिक शांतता लाभेल. धार्मिक तसेच आध्यात्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढण्याचे संकेत आहेत.
एकदम भारीच योग! बाराव्या राशीत शनि-बुधाच्या महायुतीने धुमाकूळ; 3 राशींची चांदी
धनू राशीच्या लोकांना करिअरमध्ये मिळतील नवीन संधी, धनू राशीच्या लोकांसाठी ही वेळ पुढे जाण्याची आहे. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात आणि रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतील. या काळात तुम्हाला नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या भविष्यात लाभदायक ठरतील. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
अलर्ट, मोठे निर्णय चुकतील! 23 फेब्रुवारीला मंगळ गोचराचा 3 राशींवर वाईट परिणाम
मकर राशीला मेहनतीचे फळ मिळेल, मकर राशीच्या लोकांना दीर्घकाळापासून सुरू असलेल्या त्रासातून दिलासा मिळू शकतो. पदोन्नती किंवा नवीन जबाबदारीची संधी निर्माण होईल. करिअरच्या बाबतीत तुमच्या आयुष्यात स्थिरता येईल. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. प्रवासाचे योगही जुळून येत आहेत, जे भविष्यासाठी फायदेशीर ठरतील.
