देवघर : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहाचे राशी परिवर्तन ही घटना खूप महत्त्वाची मानली जाते. मात्र, काही वेळा हे परिवर्तन होत असताना मोठा योगही तयार होतो. असाच योग या महिन्याच्या शेवटच्या दिवशी 31 मे रोजी तयार होणार आहे. 31 मे रोजी ग्रहांचा राजकुमार म्हटल्या जाणाऱ्या बुध ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे. बुध ग्रह सध्या मेष राषीमध्ये आहेत. मात्र, आता हा ग्रह वृषभ राशीत जाणार आहे. यामुळे याठिकाणी मोठा योग निर्माण होणार आहे.
advertisement
देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोक18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, 31 मे रोजी बुध ग्रह मेष राशीतून शुक्राची राशी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. याठिकाणी आधीपासून गुरू, शुक्र आणि सूर्य विराजमान आहे. बुध ग्रहाने प्रवेश केल्यानंतर वृषभ राशीमध्ये चार ग्रहांची युती होईल. यामुळे चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. या योगाचा प्रभाव हा सर्व 12 राशींवर पडणार आहे. मात्र, 3 राशीच्या लोकांना सर्वात मोठा फायदा होणार आहे.
या तीन राशीच्या लोकांचे नशिब खुलणार -
कन्या : या राशीच्या लोकांवर बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनाने खूप सकारात्मक प्रभाव पडणार आहे. नशिबाची साथ मिळेल. यामुळे प्रत्येक कार्यात यश मिळेल. धन-धान्यमध्ये वाढ होईल. नोकरीमध्ये प्रगतीचे योग तयार होईल. सोबत नवीन कार्याची जबाबदारी मिळेल. संततीपक्षाकडून एखादा शुभ समाचार मिळू शकतो. रोजगाराचा शोध संपेल.
तुम्हीही तुळशीची माळसोबत घालतात रुद्राक्ष?, आताच व्हा सावधान! महत्त्वाची माहिती..
मकर : या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे राशी परिवर्तन हे खूप खास असणार आहे. करिअर-व्यवसायात वृद्धी होईल. नोकरीत प्रमोशनसोबत वेतन वृद्धी होईल. व्यापारात जर गुंतवणूक केली तर आर्थिक लाभ होईल. पूर्वजांच्या संपत्तीमधील वाद मिटतील. आध्यात्मिक झुकाव जास्त राहणार आहे. परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
फक्त 4 तासांत तब्बल 3 हजार रुपयांची कमाई, इंजीनिअर तरुणाला नोकरी न मिळाल्याने घेतला अनोखा निर्णय
मीन : या राशीच्या लोकांवर बुधाचे राशी परिवर्तन खूप सकारात्मक प्रभाव पाडणार आहे. नवीन व्यापाराचा विचार करत असाल तर ही वेळ अगदी अनुकूल आहे. व्यवसायातून चांगली आर्थिक कमाई होऊ शकते. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर आर्थिक फायदा होईल. कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवाल. आरोग्यही चांगले राहील.
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.