तुम्हीही तुळशीची माळसोबत घालतात रुद्राक्ष?, आताच व्हा सावधान! महत्त्वाची माहिती..

Last Updated:

ऋषिकेश येथील सोमेश्वर महादेव मंदिराचे महंत रामेश्वर गिरी यांनी माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, मागच्या जन्मी तुळशीचे झाड हे वृंदा नावाची मुलगी होती.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
ईशा बिरोरिया, प्रतिनिधी
ऋषिकेश : हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाचे विशेष महत्त्व आहे. तुळशीला लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले जाते. मात्र, धार्मिक महत्त्वासोबतच शारिरीक रुपानेही तुळशीचे विशेष महत्त्व आहे. तुळशीची माळा घालण्याचे एक नव्हे तर अनेक फायदे आहेत. मात्र, ही माळा घालण्यासाठी अनेक नियमांचे पालन करावे लागते.
याबाबत उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील सोमेश्वर महादेव मंदिराचे महंत रामेश्वर गिरी यांनी माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, मागच्या जन्मी तुळशीचे झाड हे वृंदा नावाची मुलगी होती. हिचा जन्म राक्षस कुळात झाला होता. तसेच तिचा विवाह हा जलंधर नावाच्या राक्षसाशी झाला होता. पण वृंदा ही भगवान विष्णुची मोठी भक्त होती. जलंधरच्या युद्धादरम्यान ती अनुष्ठानमध्ये बसल्याने देवतांना त्या राक्षसाचा वध करता येत नव्हता.
advertisement
त्याचवेळी भगवान विष्णुने जलंधर राक्षसाचे रुप धारण केले आणि वृंदाजवळ आले. ते वृंदाजवळ आल्याने ती अनुष्ठानातून उठली आणि तिकडे युद्धा जलंधरचा वध झाला. यानंतर जेव्हा वृंदाने जलंथरचे शिर पाहिले तेव्हा तिने रागाच्या भरात भगवान विष्णुला दगड बनण्याचा शाप दिला. यानंतर सर्व देवांच्या विनंतीने तिने शाप मागे घेतला आणि आपल्या पतीचे शिर घेऊन ती सती झाली. यानंतर भगवान विष्णूने राखेतून निघालेल्या त्या रोपाचे नाव तुळशी ठेवले.
advertisement
तुळशी माळेचे फायदे -
महंत रामेश्वर गिरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, तुळशीच्या जपमाळाचे धार्मिक तसेच शारीरिक आणि मानसिक महत्त्व आहे. तुळशी धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. घरात सुख-शांती नांदते. याशिवाय, तुळशीची माळ घातल्याने व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो. तुळशीच्या माळेने मानसिक ताण कमी होतो. इतकेच नव्हे तर शरीराशी संबंधित आजारांवरही ती फायदेशीर आहे.
advertisement
तुळशीच्या जपमाळासोबत रुद्राक्ष धारण करू नये -
तुळशीची माळ घालण्यापूर्वी आणि नंतर अनेक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. ती घालण्यापूर्वी तिला आधी दूध आणि गंगाजलाने स्वच्छ करावी. यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी आणि नंतर मग तुळशीची माळ घालावी. जर तुम्ही मांस आणि मद्य सेवन करत असाल तर ही तुळशीची माळा घालू नका. तसेच रुद्राक्ष आणि तुळशीचे माळी सोबत एकत्र कधीच घातली जात नाही.
advertisement
या लक्षणांना अजिबात हलक्यात घेऊ नका, होऊ शकतो गंभीर आजार, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
रुद्राक्ष आणि तुळशीचे माळा एकत्र घालण्याची मनाई आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक मान्यतांवर ही मनाई आधारित आहे. रुद्राक्ष भगवान शंकराशी संबंधित आहे आणि त्याचा संबंध हा उग्रता आणि शक्तीशी संबंधित आहे. तर तुळशीचा संबंध भगवान विष्णूशी आहे आणि ही शांती आणि भक्तीशी संबंधित आहे. दोघांची उर्जा आणि धार्मिक महत्त्व वेगवेगळे आहे. त्यामुळे तुळशी आणि रुद्राक्ष एकत्र परिधान केल्याने त्यांची आध्यात्मिक परिणामकारकता कमी होऊ शकते. तसेच भगवान शंकर आणि विष्णूच्या उपासना पद्धतींमध्ये फरक आहे. यामुळेही हे निषिद्ध आहे. धार्मिक अनुशासन आणि परंपरांचे पालन करताना या माळा वेगवेगळ्या घालणे योग्य मानले जाते, अशी माहितीही त्यांनी दिली.
advertisement
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/अध्यात्म/
तुम्हीही तुळशीची माळसोबत घालतात रुद्राक्ष?, आताच व्हा सावधान! महत्त्वाची माहिती..
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement