शनि जयंतीचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा, राशीनुसार करा या वस्तूंचे दान, मग पाहा फायदा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
हिन्दू धार्मिक ग्रंथांनुसार, ज्येष्ठ अमावस्या तिथीला शनिदेवाचा जन्म झाला होता. त्यांचे वडील सूर्यदेव आणि माता छाया आहे.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : हिंदू हिंदू पंचांगानुसार यावर्षी 6 जूनला ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्या तिथीला शनि जयंती साजरी केली जाणार आहे. दक्षिण भारतात शनि जयंती वैशाख महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते. शनि जयंतीला न्यायदेवता शनिदेवाची पूजा केली जाते. यासोबत आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी उपवास केला जातो. शनिदेवाची पूजा केल्याने सर्व सुखांची प्राप्ती होते असे म्हटले जाते.
advertisement
हिन्दू धार्मिक ग्रंथांनुसार, ज्येष्ठ अमावस्या तिथीला शनिदेवाचा जन्म झाला होता. त्यांचे वडील सूर्यदेव आणि माता छाया आहे. धार्मिक मान्यतेनुसार, शनिदेवाची पूजा केल्याने साधकाला शनि दोषापासून मुक्ती मिळते. जर तुम्हालाही त्याच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांना समाप्त करायचे असेल तर तुम्ही विधीनुसार शनिदेवाची पूजा करा. तसेच पूजा केल्यानंतर राशीनुसार, दान करा.
अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे शनि जयंतीला राशीनुसार कोणत्या वस्तू दान कराव्या, याबाबत जाणून घेऊयात.
advertisement
मेष राशी : शनि जयंतीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी लाल रंगाची हंगामी फळे किंवा कपडे दान करावे.
वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांनी शनि जयंतीच्या दिवशी तांदूळ, साखर आणि दूध दान करावे.
मिथुन राशी : मिथुन राशीच्या लोकांनी शनि जयंतीच्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे दान करावे.
advertisement
कर्क राशी : कर्क राशीच्या लोकांनी तांदूळ आणि पांढरे वस्त्र दान करावे.
सिंह राशी : सिंह राशीच्या लोकांनी लाल रंगाचे कपडे दान करावे.
कन्या राशी : कन्या राशीच्या लोकांनी शनि जयंतीला गोशाळेत चाऱ्यासाठी पैसे दान करावे.
advertisement
तुला राशी : तूळ राशीच्या लोकांनी रस्त्यावरील प्रवाशांना पाणी पाजावे.
वृश्चिक राशी : वृश्चिक राशीच्या लोकांनी रस्त्यावरील प्रवाशांना उसाचा रस द्यावा.
धनु राशी : धनु राशीच्या लोकांनी मोराचे पिसे दान करावे.
मकर राशी : मकर राशीच्या लोकांनी शिव मंदिरात डमरू दान करावे.
कुंभ राशी: कुंभ राशीच्या लोकांनी चामड्याची चप्पल, उडीद डाळ आणि छत्री दान करावी.
advertisement
मीन राशी : शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी मीन राशीच्या लोकांनी पिकलेली केळी, बेसनाचे लाडू, बेसन इत्यादींचे दान करावे.
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
May 28, 2024 10:47 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
शनि जयंतीचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा, राशीनुसार करा या वस्तूंचे दान, मग पाहा फायदा