या 3 राशीच्या लोकांवर शनिदेवाची होणार विशेष कृपा, फक्त 1 जुलैची वाट पाहा..
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
शनिच्या चाल परिवर्तनामुळे 12 राशींवर याचा परिणाम होणार आहे. पण यामध्ये 3 राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहणार आहे. काशी येथील ज्योतिषाचार्य पंडित संजय उपाध्याय यांनी याबाबत माहिती दिली.
अभिषेक जैस्वाल, प्रतिनिधी
वाराणसी : शनिला न्याय प्रिय ग्रह मानला जातो. असे म्हणतात की, शनिदेव ज्याच्यावर प्रसन्न होतात, ते त्याला रंकापासून राजा बनवतात. त्यामुळे न्यायदेवता शनिदेव हे आता आपली चाल बदलणार आहेत. जुलै महिन्यात शनि आपल्या मूळ त्रिकोण राशी कुंभात वक्री होतील. यादरम्यान, शनि हे पूर्वाभाद्रपद नक्षत्रात राहतील.
ज्योतिषींनी दिलेल्या माहितीनुसार, शनिच्या चाल परिवर्तनामुळे 12 राशींवर याचा परिणाम होणार आहे. पण यामध्ये 3 राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहणार आहे. काशी येथील ज्योतिषाचार्य पंडित संजय उपाध्याय यांनी याबाबत माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, 1 जुलै 2024 रोजी शनि कुंभ राशीत उल्ट्या गतीने चालतील. ज्योतिष शास्त्रानुसार, शनि महाराज जेव्हाही वक्री होतील, तेव्हा ते आपल्या मागच्या राशीला फळ देतील. ज्योतिष गणनेनुसार, यामुळे मेष, वृषभ आणि वृश्चिक राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे.
advertisement
मेष राशी : मेष राशीच्या लोकांना विशेष फायदा होणार आहे. थांबलेली कामे पूर्ण होतील. अडकलेली पैसेही मिळतील. मेष राशीच्या लोकांसाठी ही वेळ खूपच फायदेशीर असणार आहे.
वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांनाही मोठा फायदा होणार आहे. लक्ष्मीची कृपा या राशीच्या लोकांवर बरसणार आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल आणि नोकरी, व्यवसायातही नवीन मार्ग खुलतील.
advertisement
वृश्चिक राशी : या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार आहे. त्यांच्या प्रगतीचे मार्ग खुलतील. नोकरी करणाऱ्यांनाही प्रमोशनचे योग तयार होतील.
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
view commentsLocation :
Varanasi,Uttar Pradesh
First Published :
May 25, 2024 2:09 PM IST


