advertisement

Valentines Week: पालकांचं टेन्शन वाढलं, छ. संभाजीनगरात तरुणी सोडतायेत घर, धक्कादायक आकडेवारी समोर

Last Updated:

Girl Missing: छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध कारणांमुळे दररोज सरासरी दोन तरुणी घर सोडत असल्याच्या नोंदी पोलिसांकडे होत आहेत.

Valentines Week: पालकांचं टेन्शन वाढलं, छ. संभाजीनगरात तरुणी सोडतायत घर, धक्कादायक आकडेवारी समोर
Valentines Week: पालकांचं टेन्शन वाढलं, छ. संभाजीनगरात तरुणी सोडतायत घर, धक्कादायक आकडेवारी समोर
छत्रपती संभाजीनगर : प्रेमाच्या उत्साहाने भारलेल्या व्हॅलेंटाइन वीकदरम्यान शहरातील वातावरण रंगतदार झाले असले, तरी त्याच काळात एक चिंताजनक बाब पुढे आली आहे. विविध कारणांमुळे दररोज सरासरी दोन तरुणी घर सोडत असल्याच्या नोंदी पोलिसांकडे होत आहेत. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेली ही आकडेवारी धक्कादायक असून, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 21 वर्षीय तरुणी म्हाडा कॉलनी बाबा पंप परिसरातून बेपत्ता झाली आहे. सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिकलठाणा बौद्धवाड्यातून 25 वर्षीय, चिकलठाण्यातून 24 वर्षीय आणि सिडको बसस्थानक परिसरातून 22 वर्षीय अशा 3 तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजयनगरातून 18 वर्षीय मुलगी घरातून निघून गेली आहे. धक्कादायक म्हणजे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 5 तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. यात रांजणगाव शेणपुंजी येथून 19 वर्षे वयाच्या 2 तरुणी, कमळापूर येथून 19 वर्षीय तरुणी, पंढरपूर येथून 25 वर्षीय तरुणी, वडगाव कोल्हाटीतून 25 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे.
advertisement
‎जिल्ह्यातून 10 तरुणी बेपत्ता...
‎छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागातून 10 तरुणी या काळात बेपत्ता झाल्या आहेत. यात शनी देवगाव (पोलीस ठाणे विरगाव) येथून 23 वर्षीय तरुणी, लासूरस्टेशन (पोलीस ठाणे शिल्लेगाव) येथून 18 वर्षीय तरुणी, पिशोर येथून (पोलीस ठाणे पिशोर) 24 वर्षीय व 23 वर्षीय अशा 2 तरुणी, झाल्टा (पोलीस ठाणे चिकलठाणा) येथून 27 वर्षीय तरुणी, गंगापूर येथून 27 वर्षीय तरुणी, उपळी (पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण) येथून 24 वर्षीय तरुणी, सिसारखेडा (पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण) येथून 23 वर्षीय तरुणी, पाचोड येथून 22 वर्षीय तरुणी, वैजापूर शहरातून 18 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Valentines Week: पालकांचं टेन्शन वाढलं, छ. संभाजीनगरात तरुणी सोडतायेत घर, धक्कादायक आकडेवारी समोर
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement