advertisement

नशेचं इंजेक्शन अन् अल्पवयीन मुलींचं भयंकर शोषण, पुण्याच्या बुधवार पेठेत खळबळ, 600 पोलिसांचं मोठं ऑपरेशन

Last Updated:

Crime in Pune: पुणे पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री बुधवार पेठ परिसरात आतापर्यंतचं सर्वात मोठं 'कॅाम्बिंग ऑपरेशन' राबवलं आहे.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: पुणे पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री बुधवार पेठ परिसरात आतापर्यंतचं सर्वात मोठं 'कॅाम्बिंग ऑपरेशन' राबवलं आहे. सुमारे ६०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राबवलेल्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. या मोहिमेमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठाही जप्त करण्यात आला आहे.
पुणे पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या विविध युनिट्सनी ही कारवाई केली. रात्री १२ च्या सुमारास अचानक मोठा फौजफाटा बुधवार पेठेत दाखल झाला. पोलिसांनी परिसरातील येण्या-जाण्याचे सर्व रस्ते बंद करून कडेकोट नाकाबंदी केली. त्यानंतर पहाटेपर्यंत चाललेल्या या ऑपरेशनमध्ये ४१ इमारतींची कसून तपासणी करण्यात आली. सुमारे ७०० संशयितांची झडती घेण्यात आली.
advertisement

बांगलादेशी महिलांची सुटका

या तपासणीत दोन बांगलादेशी महिला आणि काही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. या महिला येथे कशा आल्या आणि त्यांच्यामागे मानवी तस्करीचे रॅकेट आहे का? याचा तपास आता सुरू आहे. झडतीदरम्यान पोलिसांना ७ ग्रॅम चरस आणि अमली पदार्थांच्या इंजेक्शनचा साठा मिळून आला आहे. या इंजेक्शनचा वापर नेमका कशासाठी केला जात होता? याचे मुख्य पुरवठादार (पेडलर्स) कोण आहेत? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
advertisement
या कारवाईबद्दल माहिती देताना पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा म्हणाले, "शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अनैतिक मानवी वाहतुकीला आळा घालण्यासाठी हे व्यापक सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ आणि इंजेक्शनचे धागेदोरे शोधण्याचे काम गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलं आहे."
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नशेचं इंजेक्शन अन् अल्पवयीन मुलींचं भयंकर शोषण, पुण्याच्या बुधवार पेठेत खळबळ, 600 पोलिसांचं मोठं ऑपरेशन
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement