advertisement

तरुणांसाठी मोठी अपडेट! प्राध्यापक भरती प्रक्रियेचे नियम बदलले, नवीन निकष काय असणार? माहिती आली समोर

Last Updated:

Pradhyapak Bharati : राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्न वरिष्ठ महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरती प्रक्रिया दीर्घकाळ रखडल्याने निर्माण झालेला ताण अखेर कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

professor recruitment
professor recruitment
मुंबई : राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्न वरिष्ठ महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरती प्रक्रिया दीर्घकाळ रखडल्याने निर्माण झालेला ताण अखेर कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने बुधवारी सुधारित कार्यपद्धती जाहीर करत भरती प्रक्रियेला नव्याने गती देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेल्या ६०:२०:२० या गुणांकन पद्धतीचा या नव्या आदेशात समावेश करण्यात आला आहे.
६०:२०:२० गुणांकन पद्धतीची अंमलबजावणी
६ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या आधीच्या आदेशात सुधारणा करत नव्या कार्यपद्धतीनुसार उमेदवारांच्या शैक्षणिक व संशोधन कामगिरीला ६० टक्के गुण दिले जाणार आहेत. अध्यापन कौशल्य चाचणीसाठी २० टक्के आणि मुलाखतीतील कामगिरीसाठी २० टक्के गुण राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ मुलाखतीवर आधारित निवडीऐवजी सर्वांगीण मूल्यमापनावर भर देण्यात आला आहे.
advertisement
मानवविज्ञान शाखेला दिलासा
मानवविज्ञान शाखेतील प्राध्यापकांसाठी प्रकाशनाबाबत असलेली ‘स्कोपस’ आणि ‘वेब ऑफ सायन्स’मधील लेखांची सक्ती काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या शाखेतील अध्यापकांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांना आणि इतर दर्जेदार प्रकाशनांना गुणांकनात मान्यता देण्यात येणार आहे. समान संधीच्या तत्त्वाचा अवलंब करत उत्कृष्टतेलाही प्राधान्य देण्याचा प्रयत्न या निर्णयातून दिसून येतो.
advertisement
वरिष्ठ पदांसाठी कडक निकष
सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांसाठी मात्र अध्ययन अनुभव, संशोधन प्रकल्पांतील सहभाग, शिखर संस्थांकडून मिळालेला संशोधन निधी, पीएचडी मार्गदर्शन, अभ्यासक्रम विकास (करिक्युलम डेव्हलपमेंट) यांसारख्या निकषांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेला चालना देण्यासाठी वरिष्ठ पदांसाठी अधिक काटेकोर मूल्यमापनाची तरतूद करण्यात आली आहे.
कंत्राटी व तासिका तत्त्वावरील शिक्षकांना संधी
नव्या कार्यपद्धतीत कंत्राटी, तासिका तत्त्वावर आणि अॅडहॉक पद्धतीने कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या अनुभवाला पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यापूर्वी मुलाखतीपूर्वी ५० टक्के गुणांची सक्ती होती; ती अट शिथिल करून विद्यापीठे व महाविद्यालयांना उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याचे अधिक अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे दीर्घकाळ सेवेत असलेल्या शिक्षकांना नियमित नियुक्तीची संधी उपलब्ध होणार आहे.
advertisement
पारदर्शकतेवर भर
भरती प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी निवड समितीच्या संपूर्ण कार्यवाहीचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग बंधनकारक करण्यात आले आहे. हे रेकॉर्डिंग समिती सदस्यांच्या स्वाक्षरीने सीलबंद ठेवले जाईल आणि न्यायालयीन गरज भासल्यासच ते उपलब्ध करून दिले जाईल.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
तरुणांसाठी मोठी अपडेट! प्राध्यापक भरती प्रक्रियेचे नियम बदलले, नवीन निकष काय असणार? माहिती आली समोर
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement