advertisement

पहिल्या पत्नीचं निधन, एकट्यानं सांभाळली मुलगी; कोण आहे राजपाल यादवची दुसरी बायको? जिनं सावरलं अभिनेत्याचं आयुष्य

Last Updated:
Rajpal Yadav Wife : अभिनेता राजपाल यादव सध्या तुरुंगात आहे. पण त्याच्या बायकोची त्याला खंबीर साथ आहे. कोण आहे राजपाल यादवची बायको? दिसण्यात अभिनेत्रींनाही मागे टाकते.
1/8
बॉलिवूडमधील दिग्गज कॉमेडियन राजपाल यादव 9 कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणात अडकला आहे. नाइलाजानं राजपाल यादव यानं दिल्लीतील तिहार जेलमध्ये स्वत:ला सरेंडर केलं. ही बातमी समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.  2010 मधील 'अता पता लापता' या सिनेमासाठी घेतलेल्या कर्जाशी हे प्रकरण संबंधित असल्याचं सांगितलं जातं.

2/8
एकीकडे कायदेशीर सुरू असताना राजपाल यादवची पत्नी राधा यादव पुढे आली. तिनं कठीण काळात मदत करणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले. पडत्या काळात अभिनेत्याला पत्नीची साथ मिळाली आहे. 

3/8
राधा यादव ही अभिनेत्याची दुसरी पत्नी आहे. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर राधानं अभिनेत्याला सावरलं होतं. काय आहे दोघांची स्टोरी पाहूयात. 

4/8
अभिनेता राजपाल यादवचं पहिलं लग्न करुणा हिच्याशी झालं होतं. दोघांचा सुखाचा संसार होता. त्यांना मुलगा झाली. ज्योती असं तिचं नाव आहेत पण ज्योतीच्या जन्मावेळी करुणा यांचं निधन झालं. त्या काळात राजपाल करिअरच्या सुरुवातीच्या संघर्षातून जात होता मात्र तरीही त्यानं एकट्यानं मुलीची जबाबदारी उचलली. वडील आणि आई दोन्ही भूमिका त्यांनी निभावल्या.

5/8
करुणाच्या निधनानंतर  अभिनेत्याच्या आयुष्यात राधा यादवची एन्ट्री झाली. राधानं केवळ पत्नीची भूमिका निभावली नाही तर ज्योतीलाही सख्ख्या आईसारखं प्रेम दिलं. राधा आणि राजपाल यांना हर्षिता आणि रेहांशी या दोन मुली आहेत. तिन्ही मुलींबद्दल राजपाल नेहमीच भावूक होऊन बोलतात.

6/8
राजपाल यादवची दुसरी पत्नी राधा यादव मूळची कॅनडाच्या रहिवासी आहेत. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली. ओळख वाढली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. 10 मे 2003 रोजी दोघांनी लग्न केलं. राधा राजपालपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. दोघांच्या उंचीतही फरक आहे. राजपाल यादव यांची उंची 5 फूट 2 इंच आहे, तर राधा 5 फूट 3 इंच म्हणजे त्यांच्यापेक्षा 1 इंच उंच आहेत. पण याचा त्यांच्या संसारात कधीच परिणाम झाला नाही. 

7/8
राधा यादव हाउसवाइफ आहे. ती कायम लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करते. घर, मुलं आणि कुटुंब हीच त्यांची प्राथमिकता आहे. ग्लॅमरच्या जगापासून दूर राहून त्यांनी कुटुंब सांभाळलं. मोठी मुलगी ज्योतीचं लग्न झालं असून तिचे पती संदीप यादव इटाव्यात सहकारी बँकेत कॅशियर आहेत. तर हर्षिता आणि रेहांशी सध्या शिक्षण घेत आहेत.

8/8
राजपाल यादव यांनी करिअरची सुरुवात छोट्या भूमिकांपासून केली. 'भूल भुलैया', 'फिर हेरा फेरी', 'चुप चुप के', 'भागम भाग' यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. 

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement