Chaturgrahi Yoga 2026: महाशिवरात्रीला चतुर्ग्रही योगाची जादू; 4 राशीच्या लोकांच्या भाग्याचे दरवाजे खुले, लाईफ सेट
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Chaturgrahi Yoga 2026: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, यावर्षी महाशिवरात्रीला कुंभ राशीमध्ये चतुर्ग्रही योग तयार होत आहे, हा योग काही राशींसाठी भाग्योदयाचा ठरणार आहे. 13 फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल, त्या ठिकाणी आधीपासूनच शुक्र, बुध आणि राहू विराजमान आहेत.
advertisement
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग प्रगतीचे नवीन मार्ग उघडणारा ठरेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची भरभराट होईल आणि मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर सोपवल्या जातील. तुमचा कल कलात्मक गोष्टींकडे वाढेल आणि केलेल्या कष्टाचे योग्य फळ पदरात पडेल. प्रेमातील दुरावा संपून नात्यात गोडवा येईल आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभेल.
advertisement
सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच शुभ आहे. तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही करिअरशी संबंधित धाडसी निर्णय घेऊ शकाल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होण्यासोबतच भावंडांचे सहकार्य लाभेल. जे लोक अविवाहित आहेत, त्यांच्यासाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
advertisement
तूळ - तूळ राशीच्या व्यक्तींसाठी महाशिवरात्रीचा हा काळ अतिशय अनुकूल असेल. गेल्या अनेक दिवसांपासून अडकलेली तुमची कामे आता मार्गी लागतील. कला, अभिनय किंवा सर्जनशील क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना मोठी संधी मिळू शकते. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि एकत्र सहलीला जाण्याचे योग जुळून येतील. एकूणच तुमची आर्थिक बाजू सुधारेल.
advertisement
धनू - धनू राशीच्या लोकांसाठी हा चतुर्ग्रही योग भाग्याची साथ घेऊन येईल. व्यवसायानिमित्त तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो, जो अत्यंत फायदेशीर ठरेल. एखादी मोठी बिझनेस डील तुमच्या हाती लागण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराची खंबीर साथ मिळेल. अचानक धनलाभ झाल्यामुळे तुमची आर्थिक चिंता दूर होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









