KKR vs Punjab मॅच होणार का नाही? 23.14 चं समीकरण ठरवणार, रहाणे-अय्यर पेपर घेऊन बसले!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या कोलकाता आणि पंजाब यांच्यातल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.
कोलकाता : आयपीएल 2026 च्या कोलकाता आणि पंजाब यांच्यातल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण यानंतर केकेआरने त्यांच्या 2 विकेट गमावल्या. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा केकेआरचा स्कोअर 25/2 एवढा झाला. अजिंक्य रहाणे 8 आणि अंगक्रिश रघुवंशी 7 रनवर नाबाद खेळत आहेत. फिन ऍलन 6 तर कॅमरून ग्रीन 4 रनवर आऊट झाला. केकेआरच्या दोन्ही विकेट पंजाबचा फास्ट बॉलर झेवियर बार्टलेटने घेतल्या.
सामना होणार का नाही?
कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानातल्या या सामन्यासाठी हवामान खात्याने आधीच पावसाचा अलर्ट दिला होता. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मॅच सुरू झाल्यानंतर 15 मिनिटांच्या आतमध्येच पावसाला सुरूवात झाली, त्यामुळे अंपायरनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकी 5-5 ओव्हरचा सामना खेळायचा असेल तर रात्री 23.14 म्हणजेच 11 वाजून 14 मिनिटांच्या आत पहिला बॉल टाकावा लागणार आहे, अन्यथा हा सामना रद्द झाल्याची घोषणा अंपायर करतील आणि दोन्ही टीमना एक-एक पॉईंट दिला जाईल.
advertisement
केकेआर विजयाच्या प्रतिक्षेत
आयपीएलच्या या मोसमात केकेआरला अजून एकही विजय मिळवता आलेला नाही. केकेआरचा मुंबई आणि हैदराबादविरुद्ध पराभव झाला. मायनस 1.964 चा नेट रनरेट आणि शून्य पॉईंट्ससह केकेआर पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे पंजाबने 2 सामन्यांमध्ये गुजरात आणि चेन्नईवर विजय मिळवला. 4 पॉईंट्ससह पंजाब टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
advertisement
केकेआरच्या टीममध्ये दोन बदल
या सामन्यात केकेआरने त्यांच्या टीममध्ये दोन बदल केले. वरुण चक्रवर्ती आणि सुनिल नारायण यांच्याशिवाय केकेआर या सामन्यात उतरली. वरुण चक्रवर्तीला मागच्या सामन्यात कॅच पकडताना दुखापत झाली तर सुनिल नारायण आजारी असल्याचं केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉसवेळी सांगितलं. पंजाबने मात्र त्यांच्या टीममध्ये कोणताच बदल केलेला नाही.
advertisement
पंजाबची प्लेइंग इलेव्हन
प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर, कुपर कॉनली, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को यानसन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार वैश्यक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
केकेआरची प्लेइंग इलेव्हन
फिन ऍलन, अजिंक्य रहाणे, कॅमरून ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी, रोव्हमन पॉवेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अनुकूल रॉय, नवदीप सैनी, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी
advertisement
Location :
Kolkata,West Bengal
First Published :
Apr 06, 2026 10:12 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
KKR vs Punjab मॅच होणार का नाही? 23.14 चं समीकरण ठरवणार, रहाणे-अय्यर पेपर घेऊन बसले!








