TRENDING:

Vastu Tips: ज्या घरात नियमित केल्या जातात अशा 5 गोष्टी तिथं पैसा कधीच कमी पडत नाही

Last Updated:

Vastu Tips Marathi: आयुष्यात येणाऱ्या अडचणींना केवळ नशिबाचा फेरा न म्हणता, आपल्या घरातील वास्तुदोष कारणीभूत असू शकतो. वास्तू तज्ज्ञांच्या मते, घरातील ऊर्जेचा समतोल बिघडला की लक्ष्मी प्रसन्न होत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कमाई चांगली असूनही अनेकांच्या हातात पैसा टिकत नाही, अनेकदा असं होतं की, बँक बॅलन्स वाढायला सुरुवात होते न होते, तोच अचानक एखादं मोठं संकट उभं ठाकतं किंवा असे काही खर्च निघतात की साठवलेला सगळा पैसा खर्च होऊन जातो. याला केवळ नशिबाचा फेरा न म्हणता, आपल्या घरातील वास्तुदोष कारणीभूत असू शकतो. वास्तू तज्ज्ञांच्या मते, घरातील ऊर्जेचा समतोल बिघडला की लक्ष्मी प्रसन्न होत नाही. हा वास्तुदोष दूर करून आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी खालील उपाय अतिशय प्रभावी ठरतात.
News18
News18
advertisement

उत्तर दिशेचे महत्त्व आणि स्वच्छता - वास्तुशास्त्रात उत्तर दिशेला कुबेर देवाचे आणि माता लक्ष्मीचे स्थान मानले गेले आहे. ही दिशा म्हणजे पैशांचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या दिशेला तुम्ही जुन्या अडगळीच्या वस्तू, जड लोखंडी सामान किंवा कचरा साठवून ठेवला असेल, तर धनाचा ओघ थांबतो. त्यामुळे ही दिशा नेहमी मोकळी, स्वच्छ आणि हलकी ठेवावी. शक्य असल्यास येथे निळ्या रंगाचा वापर करावा किंवा कुबेर यंत्राची स्थापना करावी, ज्यामुळे घरात पैशांची आवक वाढते.

advertisement

नकारात्मकता पसरवणाऱ्या तुटलेल्या वस्तू - अनेकांना सवय असते की एखादं भांडं थोडं तडा गेलेला असला तरी ते वापरतात किंवा घराच्या कोपऱ्यात टाकून देतात. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या कोणत्याही भागात, विशेषतः स्वयंपाकघरात तुटलेली भांडी, बंद पडलेली घड्याळे किंवा तडा गेलेला आरसा ठेवणे म्हणजे गरिबीला आमंत्रण देणे होय. अशा वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि विनाकारण खर्च वाढतात. त्यामुळे घरातील निरुपयोगी आणि तुटलेले सामान वेळोवेळी बाहेर काढावे.

advertisement

विजया एकादशीला कुंभ संक्राती; सिंहसहित 5 राशींच्या आयुष्यात नवीन प्रकाश, नवपर्व

तिजोरीची योग्य मांडणी - पैशांचे कपाट किंवा तिजोरी कुठे ठेवावी, याचेही काही नियम आहेत. तिजोरी नेहमी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला असणे शुभ मानले जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुमची तिजोरी अशा पद्धतीने ठेवा की तिचे दार उघडल्यावर ते उत्तर दिशेकडे उघडेल. असे मानले जाते की, उत्तरेकडून येणारी कुबेराची ऊर्जा तिजोरीत साठली जाते. तिजोरी कधीही रिकामी ठेवू नका, त्यात एखादे चांदीचे नाणे किंवा लाल कापड ठेवणे अधिक शुभ ठरते.

advertisement

लागोपाठ 15 दिवसात 2 ग्रहणे; जाणीवपूर्वक टाळाव्या लागतील या गोष्टी, कोणाला अलर्ट

गुरुवारची विशेष विष्णू पूजा - सतत आर्थिक अडचणी येत असतील, तर भगवान विष्णूंची उपासना करणे हा उत्तम उपाय आहे. दर गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून विष्णूंची पूजा केल्याने कुंडलीतील 'गुरु' ग्रह प्रबळ होतो, जो संपत्तीचा कारक आहे. पूजेमध्ये पिवळी फुले, चण्याची डाळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा. तसेच पिवळ्या वस्तूंचे गरिबांना दान केल्याने धन प्राप्तीचे मार्ग सुकर होतात आणि कर्जातून मुक्ती मिळते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

शुभ दीप आराधना - घराचा मुख्य दरवाजा हा केवळ माणसांच्या येण्याजाण्यासाठी नसून तो लक्ष्मीच्या आगमनासाठीही असतो. रोज संध्याकाळी तिन्हीसांजेला घराच्या मुख्य दरवाजावर शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने घराचे रक्षण होते आणि समृद्धी येते. दिवा लावताना तो घराबाहेर पडताना तुमच्या उजव्या बाजूला असेल याची काळजी घ्या. या साध्या उपायामुळे घरातील क्लेश दूर होतात आणि कुटुंबावर लक्ष्मीची कृपा कायम राहते.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: ज्या घरात नियमित केल्या जातात अशा 5 गोष्टी तिथं पैसा कधीच कमी पडत नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल