सौंदर्याची आवड आणि शृंगारिक स्वभाव: वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने या व्यक्ती अतिशय शृंगारिक असतात. त्यांना नटण्या-थटण्याची आणि स्वतःला नीटनेटके ठेवण्याची प्रचंड आवड असते. त्या केवळ स्वतःच सुंदर दिसत नाहीत, तर त्यांना त्यांच्या आजूबाजूला असलेल्या वस्तूही सुंदरच लागतात. महागडे परफ्यूम्स, ब्रँडेड कपडे आणि दागिन्यांची त्यांना विशेष आवड असते.
टापटीप आणि शिस्तबद्ध राहणीमान: वृषभ राशीच्या लोकांना 'अस्ताव्यस्त' गोष्टींचा प्रचंड तिरस्कार असतो. त्यांचे घर असो वा ऑफिसचे टेबल, प्रत्येक वस्तू जागेवरच हवी. त्यांना घराची सजावट करायला खूप आवडते. साध्या वस्तूंनी सुद्धा घर कसे राजवाड्यासारखे दिसेल, यात या राशीच्या व्यक्तींचा हात कोणी धरू शकत नाही. अस्वच्छता किंवा विस्कळीतपणा दिसला की त्यांचा पारा चटकन चढतो.
advertisement
सर्वांना बरोबर घेऊन जाणारी वृत्ती: या राशीच्या व्यक्ती स्वभावाने खूप प्रेमळ आणि विश्वासू असतात. ते कुटुंबातील असोत वा मित्रमंडळींतील, सर्वांना एकत्र घेऊन चालण्यावर त्यांचा भर असतो. संकटाच्या वेळी ही माणसे खंबीरपणे पाठीशी उभी राहतात. 'कौटुंबिक जिव्हाळा' हा त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू असतो.
कलेची उत्तम जाण: संगीत, चित्रकला, अभिनय किंवा पाककला यांपैकी कोणत्या ना कोणत्या कलेची वृषभ राशीला उत्तम जाण असते. या राशीच्या व्यक्तींचे जेवण बनवणे आणि ते वाढण्याची पद्धतही अतिशय कलात्मक असते. त्यांना दर्जेदार अन्नाची आणि सुमधुर संगीताची मोठी आवड असते.
जिद्दी आणि संयमी स्वभाव: वृषभ राशीचे चिन्ह 'बैल' आहे. ज्याप्रमाणे बैल कष्टाळू आणि जिद्दी असतो, तशाच या व्यक्ती असतात. एकदा एखादे काम करायचे ठरवले की ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत. त्यांचा संयम वाखाणण्याजोगा असतो, पण जर कोणी त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला, तर त्यांचा राग अनावर होतो.
आर्थिक स्थिरता आणि प्रॅक्टिकल विचार: या राशीच्या व्यक्ती हवेत इमले बांधणाऱ्या नसतात. त्या अतिशय व्यवहारचतुर असतात. भविष्यासाठी बचत करणे आणि आर्थिक सुरक्षा निर्माण करणे याला त्या प्राधान्य देतात. त्यांचे आयुष्य नियोजनबद्ध असते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
