ऑगस्टमध्ये जन्मलेल्या लोकांची वैशिष्ट्ये -
- ऑगस्टमध्ये जन्मलेले लोक खूप आत्मविश्वासी असतात. या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असतात.
- हे लोक प्रामाणिक आणि धैर्यवान देखील असतात. त्यांच्यात प्रचंड उत्साह असतो. मनातलं बोलायला तो कधीच मागेपुढे पाहत नाहीत. या सर्व गोष्टी त्या उत्साहाने करतात.
- ते स्वभावानं खूपच चांगले असतात. हे लोक कोणतेही काम चोखपणे करतात. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना नक्कीच मिळते. त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.
advertisement
या राशींवर शनीची असते विशेष कृपा; साडेसाती, महादशेतही शुभ गोष्टी घडून येतात
- ऑगस्टमध्ये जन्मलेले लोक इतरांचा आदर करतात आणि इतरांनी त्यांचा आदर करण्याची इच्छा असते. लोकांच्या मनावर अधिराज्य करण्यात ते निष्णात असतात. त्यांना राजेशाही शैलीत राहायला आवडते.
- या लोकांचा स्वभाव खूप हट्टी असतो. त्यांचा हट्टी स्वभाव कामातही दिसून येतो. त्यांनी ठरवलेले काम ते पूर्ण करतात.
- ते धैर्य आणि उर्जेने परिपूर्ण भरलेले असतात. या लोकांमध्ये नेत्याचे सर्व गुण असतात.
करिअर, आरोग्य आणि लव्ह लाइफ -
ऑगस्टमध्ये जन्मलेल्या लोकांना प्रशासकीय कामात यश मिळते. हे कोणतेही काम चांगले करू शकतात. कुंडलीत सूर्य दुर्बल स्थितीत असेल तर त्यांना आजारांना सामोरे जावे लागते. लव्ह लाईफच्या बाबतीत, त्यांना आनंदी जीवन मिळते. वैवाहिक जीवन चांगले असते.
या जन्मतारखांची जोडी जमली तर प्रगती ठरलेली! पण, प्रेमात नसते इमोशनल अटॅचमेंट
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)