TRENDING:

Car येईल दारात! तुमचे बजेट 5 लाख असेल तर 3 कार सगळ्यात बेस्ट, मायलेजही 25 किमी

Last Updated:

दारात चारचाकी उभी करण्याआधी काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. आपलं बजेट, वापर आणि कारची किंमत किती असली पाहिजे अशा सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात केल्यानंतर ऑटो इंडस्ट्रीमध्ये सगळ्याचं वाहनांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबीयांनी दिवाळी मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली. पण अजूनही तुम्ही कार घेण्याचा प्लॅन करत असाल तर कारच्या किंमती कमीच आहे. पण, दारात चारचाकी उभी करण्याआधी काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. आपलं बजेट, वापर आणि कारची किंमत किती असली पाहिजे अशा सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. आता जर तुमचं बजेट ५ लाख रुपये असेल तर त्यासाठी एक खास पर्याय आहे.
advertisement

समजा तुमचं उत्त्पन हे जर ५ लाखांच्या घरात असेल कार खरेदीसाठी आता बरेच पर्याय आहे. एक तर नवी कार घ्या, नाहीतर सेकंड हँड कार घेऊ शकता. पण नवीन कार घेण्यासाठी कारची एकूण ऑन-रोड किंमत तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या ५०% पेक्षा जास्त नसावी. याचा अर्थ असा की २.५ लाख ते  ३ लाखांपर्यंतची ऑन-रोड किंमत असलेली कार तुमच्यासाठी बेस्ट आहे. या बजेटमध्ये, तुम्ही कदाचित त्याच्या बेस मॉडेलमध्ये नवीन कार किंवा चांगल्या स्थितीत वापरलेली कार घेऊ शकता.

advertisement

नवीन कार खरेदी करायची?

बेस मॉडेल आणि सर्वात परवडणारा पर्याय जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्ही जास्त खर्च करणार नसाल तर तुम्ही सुमारे ४ लाखांच्या एक्स-शोरूम किमतीच्या एंट्री-लेव्हल हॅचबॅकच्या बेस मॉडेलचा विचार करू शकता.

मॉडल एक्स-शोरूम किंमत (अंदाजे) मायलेज (ARAI) फिचर्स
मारुती सुजुकी S-प्रेसो 3.50 लाखांपासून सुरू 24-25 kmpl  उच्च ग्राउंड क्लीयरन्स, मिनी-SUV लूक
मारुती सुझुकी अल्टो K10 3.70 लाखांपासून सुरू 24-25 kmpl सर्वात स्वस्त पर्याय, मारुतीचा विश्वास, बेस्ट रीसेल व्हॅल्यू.
रेनो क्विड 4.30 लाखांपासून सुरू 22-23 kmpl स्टायलिश लूक, चांगली वैशिष्ट्यं (टॉप मॉडेलमध्ये), SUV सारखी डिझाइन.

advertisement

कार लोन घेताना हे लक्षात ठेवा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दराबाबत मोठी अपडेट, मिळाला विक्रमी 6200 रुपये दर, आणखी भाव वाढणार?
सर्व पहा

कार खरेदी करण्यापूर्वी, लक्षात ठेवा की, या कारच्या बेस मॉडेलची ऑन-रोड किंमत (RTO, विमा इत्यादींसह) सुमारे ₹४.५ लाख असू शकते. म्हणून, जर तुम्ही कर्ज घेतले तर EMI तुमच्या मासिक पगाराच्या १५-२०% पेक्षा जास्त नसावा. अशा प्रकारे, आर्थिक सावधगिरी बाळगून, तुम्ही तुमच्या खिशावर जास्त ताण न टाकता कमी पगारासह कारचे मालक बनू शकता.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
Car येईल दारात! तुमचे बजेट 5 लाख असेल तर 3 कार सगळ्यात बेस्ट, मायलेजही 25 किमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल