नबीलाल पठाण यांनी सांगितलं की, त्यांचे सहकारी संदीप गवारे यांच्यासोबत त्यांनी उत्तराखंडमधील गढवाल हिमालयातील 15,069 फूट (4,593 मीटर) उंचीवर असलेल्या पांगारचुल्ला शिखरावर ट्रेकिंग मोहीम केली. ही मोहीम 17 डिसेंबरला सुरू झाली आणि 21 डिसेंबरला यशस्वीरीत्या पूर्ण झाली. या मोहिमेत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
advertisement
मोहिमेदरम्यान तापमान मायनस 5 ते मायनस 10 अंश सेल्सियस दरम्यान होते. साधारणपणे 15,500 फूट उंचीवर भारतीय सेनेला आदरांजली अर्पण करण्यात आली. देशासाठी सेवा करणाऱ्या सैनिकांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता.
आजपर्यंत त्यांनी 75 पेक्षा अधिक किल्ले यशस्वीरित्या सर केले आहेत. तसेच सह्याद्री पर्वतरांगांमधील अनेक कठीण दुर्गसुद्धा त्यांनी चढले आहेत. हिमालयातील मोहिमांमध्ये केदारकंठा ट्रेक (12,500 फूट) हा पहिला मोठा टप्पा ठरला. त्यानंतर पांगारचुल्ला शिखर (15,000 फूट) यशस्वीरित्या सर केले. शिवाय, माउंट युनम (21,000 फूट) सारख्या आव्हानात्मक उच्चशिखर मोहिमा देखील पूर्ण केल्या आहेत.





