पुणे महापालिकेत भाजपचं 'महिला राज', तब्बल 91 'लाडक्या बहिणी' मैदानात, कुणाकुणाला संधी? वाचा यादी

Last Updated:

यंदा भाजपने पुण्यात सर्वाधिक महिलांना उमेदवारी देत इतिहास घडवला आहे. तब्बल 165 जागांपैकी 91 जागांवर महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.

PMC BJP Women Candidate List
PMC BJP Women Candidate List
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (Pune Municipal Corporation Election 2026) भाजपाकडून उमेदवारांची नावं समोर आली आहे.  या उमेदवारांना भाजपाकडून  (BJP Candidate List BMC 2026) एबी फॉर्मही देण्यात आले. यादी जाहीर झाल्यानंतर पुण्यात भाजपने एक क्लिअर मेसेज दिला आहे. पुणे महापालिकेत भाजपने जास्तीत महिलांना संधी दिली आहे. महिलांच्या सशक्तीकरणाचा मुद्दा केवळ भाषणांपुरता न ठेवता, प्रत्यक्ष निवडणुकीत अंमलात आणल्याचे भाजपच्या उमेदवारी यादीतून समोर आले आहे.
advertisement
यंदा भाजपने पुण्यात सर्वाधिक महिलांना उमेदवारी देत इतिहास घडवला आहे. तब्बल 165 जागांपैकी 91 जागांवर महिलांना उमेदवारी देण्यात आली असून, हा आकडा इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे केवळ महिला आरक्षित वार्डांपुरते न थांबता, सर्वसाधारण पुरुष वार्डांमध्येही भाजपने महिलांवर विश्वास दाखवत त्यांना संधी दिली आहे. सर्वसाधारण वार्डातून पुरुष उमेदवारांना वगळत तब्बल 9 महिलांना संधी देण्यात आली आहे.
advertisement

पुण्यात सर्वाधिक महिलांना भाजपने का संधी दिली?

भाजपच्या या निर्णयामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजनेच्या   संकल्पनेला निवडणुकीच्या मैदानात उतरवत, महिलांना नेतृत्वाची संधी देत स्पष्ट संदेश भाजपने दिला आहे. पक्षाच्या नेत्यांच्या मते, महिलांमध्ये असलेली प्रशासकीय क्षमता, समाजाशी असलेला थेट संपर्क आणि स्थानिक प्रश्नांची जाण यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement

महापालिका निवडणुकीत महिलांना सर्वाधिक संधी देणारा भाजप  एकमेव पक्ष 

पुणे शहरात शिक्षण, आयटी, उद्योग आणि सामाजिक चळवळींचा मोठा वारसा आहे. या पार्श्वभूमीवर महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे ही काळाची गरज असल्याने भाजपने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत महिलांना केवळ प्रतिनिधित्वच नव्हे, तर निर्णायक भूमिका देण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते.
advertisement

पुण्यात आरक्षण नसलेल्या जागांवर या महिलांना संधी

  • निवेदिता एकबोटे
  • संगीता दांगट
  • अर्चना जगताप
  • विनया बहुलिकर
  • कविता वैरागे
  • वीणा घोष
  • पल्लवी जावळे
  • रेश्मा भोसले
  • रंजना टिळेकर

पुण्यातील भाजप उमेदवाराची संपूर्ण यादी

प्रभाग क्रमांकप्रभागाचे नावउमेदवार १उमेदवार २उमेदवार ३उमेदवार ४
कळस-धानोरीराहुल भंडारेसंगीता दांगटवंदना खांदवेअनिल टिंगरे
फुलेनगर-नागपूर चाळरेणुका उगलेसुधीर वाघमोडेपूजा जाधवराहुल जाधव
विमाननगर-लोहगावश्रेयस खांदवेअनिल सातवऐश्वर्या पठारेरामदास दाभाडे
खराडी-वाघोलीशैलजित बनसोडेरत्नमाला सातवतृप्ती भरणेसुरेंद्र पठारे
कल्याणीनगर-वडगाव शेरीनारायण गलांडेश्वेता गलांडेकविता गलांडेयोगेश मुळीक
येरवडा-गांधीनगरसंतोष आरडेईशा विटकरसंगीता धुमाळसंजय भोसले
गोखलेनगर-वाकडेवाडीनीशा मानवतकरसायली माळवेरेश्मा भोसलेहरीश निकम
औंध-बोपोडीपरशुराम वाडेकरभक्ती गायकवाडसपना छाजेडसनी निम्हण
सूस-बाणेर-पाषाणरोहिणी चिमटेगणेश कळमकरमयूरी कोकाटेलहू बालवडकर
१०बावधन-भुसारी कॉलनीकिरण दगडेरूपाली पवारअर्पणा वरपेदिलीप वेडेपाटील
११रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगरअजय मारणेशर्मिल शिंदेमनीषा बुटालाअभिजित राऊत
१२शिवाजीनगर-मॉडेल कॉलनीअमृता म्हेत्रेअपूर्वा खाडेपूजा जगडेडॉ. निवेदिता एकबोटे
१३पुणे स्टेशन-जय जवाननगरनीलेश आल्हाटशोभा मेमाणेअश्विनी भोसलेसोनू निकाळजे
१४कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवाहिमाली कांबळेकिशोर धायरकरमंगला मंत्रीउमेश गायकवाड
१५मांजरी बुद्रुक-केशवनगरनंदा आबनावेडॉ. महादेव कोंढरेसारिका घुलेशिवराज घुले
१६हडपसर-सातववाडीशिल्पा होळेउज्ज्वला जंगलेआबा तुपेसंदीप दळवी
१७रामटेकडी-माळवाडीखंडू लोंढेशुभांगी होळेपायल तुपेप्रशांत तुपे
१८वानवडी-साळुंखे विहारधनराज घोगरेकालिंदी पुंडेकोमल शेंडकरअभिजित शिवरकर
१९कोंढवा खुर्द-कौसर बागनूर फातिमा हुसेन खानसुप्रिया शिंदेसतपाल पारघेअमर गव्हाणे
२०शंकर महाराज मठ-बिबवेवाडीराजेंद्र शिळीमकरमानसी देशपांडेमहेंद्र सुंदेचातन्वी दिवेकर
२१मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्कप्रसन्न वैरागेसिद्धी शिळीमकरमनीषा चोरबोलेश्रीनाथ भिमाले
२२काशेवाडी-डायस प्लॉटमृणाल कांबळेसंदीप लडकतअर्चना पाटीलविवेक यादव
२३रविवार पेठ-नाना पेठपल्लवी जावळेअनुराधा मंचरेऋतुजा गडाळेविशाल धनवडे
२४कसबा गणपती-के.नेहरू रुग्णालयकल्पना बहिरटउज्ज्वला यादवदेवेंद्र वडकेगणेश बिडकर
२५शनिवार पेठ-म.फुले मंडईस्वप्नाली पंडितराघवेंद्र उर्फ बापू मानकरस्वरदा बापटकुणाल टिळक
२६घोरपडे पेठ-गुरुवार पेठविष्णू हरिहरप्रज्ञा माळवदेऐश्वर्या थोरातअजय खेडेकर
२७नवी पेठ-पर्वतीअमर आवळेस्मिती वस्तेलता गौडधीरज घाटे
२८जनता वसाहत-हिंगणे खुर्दवृषाली रिठेमनीषा बोडकेविनया बहुलीकरप्रसन्न जगताप
२९डेक्कन जिमखाना-हॅपी कॉलनीसुनील पांडेमंजुश्री खर्डेकरमिताली सावळेकरपुनीत जोशी
३०कर्वेनगर-हिंगणे-होम कॉलनीसुशील मंगडेरेश्मा बराटेतेजश्री पवळेराजाभाऊ बराटे
३१मयूर कॉलनी-कोथरूडदिनेश माथवडज्योत्स्ना कुलकर्णीवासंती जाधवपृथ्वीराज सुतार
३२वारजे-पॉप्युलरनगरहर्षदा भोसलेसायली वांजळेभारतभूषण बराटेसचिन दोडके
३३शिवणे-खडकवासलाधनश्री कोल्हेममता दांगटसुभाष नाणेकरकिशोर पोकळे
३४नऱ्हे-वडगाव बुद्रुकहरिदास चरवडकोमल नवलेजयश्री भूमकरराजाभाऊ लायगुडे
३५सनसिटी-माणिकबागज्योती गोसावीमंजूषा नागपुरेसचिन मोरेश्रीकांत जगताप
३६सहकारनगर-पद्मावतीवीणा घोषशैलजा भोसलेसई थोपटेमहेश वाबळे
३७धनकवडी-कात्रज डेअरीबाळा धनकवडेवर्षा तापकीरतेजश्री बदकअरुण राजवाडे
३८बालाजीनगर-आंबेगावअश्विनी चिंदेसंदीप बेलदरेराणी भोसलेप्रतिभा चोरघे
३९अप्पर सुपर-इंदिरानगरवर्षा साठेदिंबर धवरीरूपाली धाडवेबाळा ओसवाल
४०कोंढवा बुद्रुक-येवलेवाडीअर्चना जगतापवृषाली कामठेपूजा कदमरंजना टिळेकर
४१महंमदवाडी-उंड्रीप्राची आल्हाटजीवन जाधवस्नेहल दगडेअतुल तरवडे
advertisement

पुण्यातील भाजपच्या 9 शिलेदारांकडे सगळ्यांचं लक्ष 

भाजपने जाहीर केलेल्या यादीत सर्वसाधारण वार्डातून संधी मिळालेल्या नऊ महिला शिलेदारांची सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या महिला उमेदवारांनी विविध सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक पातळीवर काम केल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या महिलांकडून निवडणुकीत दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच, यंदाच्या पुणे महापालिका निवडणुकीत महिलांना सर्वाधिक संधी देणारा भाजप हा एकमेव पक्ष ठरला असून, या निर्णयाचा निवडणूक निकालावर काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे महापालिकेत भाजपचं 'महिला राज', तब्बल 91 'लाडक्या बहिणी' मैदानात, कुणाकुणाला संधी? वाचा यादी
Next Article
advertisement
BMC Election : मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
  • आता अनेक प्रभागांतील लढतींचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.

  • मात्र, मतदानापूर्वीच महायुतीला दोन जागांवर मोठा धक्का बसला आहे.

  • दोन जागांवर महायुतीचे उमेदवार नाहीच.

View All
advertisement