मुंबईतून 'या' ठिकाणी प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; वाहतूक व्यवस्थेत करण्यात आला मोठा बदल
Last Updated:
Traffic Update : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील प्रमुख महामार्गांवर 31 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन पर्यटकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
मुंबई : राज्यात 25 डिसेंबरपासून शाळा, कॉलेज आणि अनेक कार्यालयांना सलग सुट्ट्या मिळाल्यामुळे नागरिकांनी पर्यटनासाठी बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक विविध पर्यटनस्थळांकडे जात आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्याचा विशेष समावेश आहे.
मुंबईहून या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांसाठी मोठा निर्णय
रायगड हा पर्यटन जिल्हा असल्याने मांडवा, अलिबाग, किहीम, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, माथेरान तसेच रायगड किल्ला अशा ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. बहुतांश पर्यटक स्वतःची वाहने घेऊन येत असल्याने प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही गर्दी लक्षात घेता आणि पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
advertisement
जाणून घ्या वाहतूक बदल
31 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत रायगड जिल्ह्यातील काही प्रमुख महामार्ग आणि राज्यमार्गांवर जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. वडखळ ते अलिबाग तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक रस्ते अरुंद असल्याने या काळात मोठी वाहतूक कोंडी होते. याचा त्रास सर्वसामान्य नागरिक, पर्यटक तसेच रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांना होतो.
advertisement
ही अडचण टाळण्यासाठी आणि अपघातांचा धोका कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही बंदी जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना लागू असणार नाही. दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, भाजीपाला, पाणी, औषधे आणि ऑक्सिजन वाहून नेणारी वाहने या बंदीतून वगळण्यात आली आहेत. तसेच पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची वाहने नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.
advertisement
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किशन ना. जावळे यांनी मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत. ही वाहतूक बंदी 31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग आणि संबंधित तहसीलदार करणार आहेत. अवजड वाहतूक बंद झाल्यास नववर्षाच्या काळात वाहतूक काही प्रमाणात सुरळीत होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 2:52 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईतून 'या' ठिकाणी प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; वाहतूक व्यवस्थेत करण्यात आला मोठा बदल










