Maharashtra Cabinet: महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कॅबिनेट बैठकीत फक्त १ निर्णय, तो कोणता?

Last Updated:

Maharashtra Cabinet Decision: नववर्षाच्या अखेरच्या दिनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल खात्याने महत्त्वाचा निर्णय घेतला.

Cabinet Meeting
Cabinet Meeting
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील सगळेच राजकीय पक्ष, नेते मंडळी निवडणूक कामांत गुंतून गेले आहेत. असे असताना नववर्षाच्या अखेरच्या दिनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल खात्याने महत्त्वाचा निर्णय घेतला. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत केवळ एकच निर्णय घेण्यात आला.

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन (महसूल विभाग)

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
चिखलदरा येथील सुमारे साडे सात एकर जमीन १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात आली होती. पण ही जमीन वापराविना पडून होती. दरम्यान, अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थान यांनी चिखलदरा येथील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. या संस्थानाने या दोन्ही देवस्थानच्या विकासासाठी शासनाकडे जमिनीची मागणी केली आहे.
advertisement
त्यानुसार पर्यटन विकास महामंडळाकडील सुमारे तीन एकर ८ आर जमीन शासन जमा करून घेऊन, ती श्री. अंबादेवी संस्थानास विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही जमीन मंदिर संस्थानाला भोगवटादार वर्ग – २ म्हणून मिळणार असून, जमीन केवळ धार्मिक प्रयोजनासाठी वापरता येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Cabinet: महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कॅबिनेट बैठकीत फक्त १ निर्णय, तो कोणता?
Next Article
advertisement
BMC Election : मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
  • आता अनेक प्रभागांतील लढतींचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.

  • मात्र, मतदानापूर्वीच महायुतीला दोन जागांवर मोठा धक्का बसला आहे.

  • दोन जागांवर महायुतीचे उमेदवार नाहीच.

View All
advertisement